Search
Close this search box.

Tuljapur Sameer Patel Death Case: मुलीचा पाठलाग केल्याच्या कारणावरून वाद; समीर पटेलला संपवलं, तुळजापुरात थरार, माजी नगराध्यक्ष संतोष कदमसह दोघांना अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तुळजापूर शहरात 18 वर्षीय समीर जब्बार पटेल (Sameer Patel Death Case) या तरुणाची मारहाण करून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष संतोष देविदास कदम ऊर्फ परमेश्वर आणि संजय विलास जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रणव देवकते, मस्के आणि अन्य दोन अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे. मुलीचा पाठलाग करून त्रास देत असल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

समीर हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी.कॉम प्रथम वर्षात शिकत होता. 3 नोव्हेंबर रोजी परीक्षा देऊन घरी परतल्यानंतर त्याला काही जणांनी सोबत नेले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. भारतीयबुवा मठाजवळील पार्किंग परिसरात तो जखमी अवस्थेत आढळला. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेत त्याचा नातेवाईक अरबाज अफसर सय्यदही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल- (Tuljapur Sameer Patel Death Case)

समीरच्या आईच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संतोष कदम आणि संजय जाधव या दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. घटनेत वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहितीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय? (Dharashiv Tuljapur Sameer Patel Death Case)

धाराशिवच्या तुळजापूरात प्रेम प्रकरणाच्या संशयातून 2 तरुणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत समीर जब्बार पटेल याचा मृत्यू झाला असून अरबाज अफसर सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. अरबाज सय्यद हा तुळजापूर शहरात चहा पीत बसला असताना तिघांनी त्याला बळजबरीने वाहनात बसवून शिंदे महाराज यांच्या शेतात नेले. तेथे त्याच्या तोंडावर आणि पाठीवर बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर मोबाईलचा पासवर्ड घेऊन मोबाईलची तपासणी करण्यात आली. मोबाईलमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नसतानाही त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली असे जखमी तरुणाचे म्हणणे आहे. अरबाजच्या खिशातील दहा हजार रुपये काढून घेत, ‘तू आमच्याच भागात कमावतोस आणि आमच्या मुलींना त्रास देतोस,’ असा आरोप करत तब्बल 2 तास त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर समीर पटेल याला घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. तेथे 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्यालाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत समीरचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अरबाज यालाही मृत समजून तुळजापूर शहरातील पार्किंग परिसरात आणून टाकण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.दरम्यान, या प्रकरणात तुळजापूर पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें