Search
Close this search box.

मुंबईत पुन्हा धावत्या लोकलमधून तरुणाला फेकलं, दरवाजात उभं राहण्यावरुन वाद, बोरीवली स्थानकात थरार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई लोकलमध्ये होणारे वाद आणि त्यातून होणाऱ्या गुन्ह्यांचा गंभीर प्रश्न समोर उभा आला आहे. काही दिवसांपूर्वी लोकलमधील झालेल्या वादामुळं एकाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर गुरुवारी आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरुन झालेल्या वादात एका प्रवाशाने 24 वर्षीय तरुणाला धावत्या लोकलमधून फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या वादात सहप्रवाशाने 24 वर्षीय तरुणाला लाथ मारल्याने तो धावत्या लोकलमध्ये रुळावर पडला आणि गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाचे नाव तौसिफ शेख असून, तो नालासोपारा येथे राहत असून, कारपेंटर म्हणून काम करतो. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी नालासोपाऱ्यातील 30 वर्षीय राहुलकुमार पांडे याला अटक केली आहे.

मंगळवारी रात्री तौसिफ हा सहकारी हुसैन अली याच्यासोबत रात्री 8.41 वाजता गोरेगावहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये चढला. दोघेही सामान्य इब्याच्या दरवाजाजवळ उभे होते. दरम्यान, त्यांची लोकल कांदिवली स्थानकात आली. त्यावेळी राहुल पांडे हा त्या डब्यात चढला आणि तो तौसिफ व हुसेनसमोर उभा राहिला आणि तेथूनच त्यांच्यात वाद सुरू झाला.

लोकल बोरिवली स्थानकात येताच…

लोकल बोरिवली स्थानकात पोहोचत असताना तौसिफने दरवाजात गर्दी होऊ नये आणि प्रवाशांना उतरण्यास सोपे जावे, यासाठी पांडेला आत सरकण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हुसेनने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता बाचाबाचीचे रूपांतर झटापटीत झाले.
बोरिवली स्थानकातून लोकल सुटल्यानंतर पांडेने तौसिफच्या दिशेने जात त्याच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. त्यामुळे तौसिफ धावत्या लोकलमधून खाली पडला.

तौसिफ जखमी अवस्थेत बोरिवली स्थानकात पोहोचला. रेल्वे पोलिसांनी त्याला प्रथमोपचारासाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेले. तौसिफला पुढील उपचारासाठी कांदिवलीतील डॉ. आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हुसेनला पहिला रेल्वे पोलिसांच्या चौकीत आणले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.

तौसिफ नेहमीप्रमाणे घरी न परतल्याने कुटुंबीय चित्तेत होते. त्याचा फोनही खराब झाल्याने संपर्क होत नव्हता. मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास त्याच्या आईला फोनवरून तो रुग्णालयात असल्याचे समजले. डोक्याला टाके घालण्यात आले असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें