केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या तिरुअनंतपुरम येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (मार्क्सवादी) (CPIM) कार्यकर्त्यांना गाड्यांच्या काचा फोडत, तोडफोड करत आपला संताप व्यक्त केला आहे. ‘कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड’ (CMRL) प्रकरणाच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज्यभरातील 10 ठिकाणी छापे टाकले असताना हा हल्ला घडला. यामध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री आणि CPI(M) नेते पिनराई विजयन यांच्या निवासस्थानाचाही समावेश होता.
ANI ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता या कारवाईमुळे नाराज झालेले पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि विरोध करण्यास सुरुवात केली. यादरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता, जे सीपीएमच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. पण तरीही कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला केला.
CPIM कार्यकर्त्यांना हाताने आणि पायाने हल्ला करत कारच्या काचा फोडल्या. एका कार्यकर्त्याने तर वीट हातात घेऊन कारची पुढील काच फोडली.








