Search
Close this search box.

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आजपासून 9 दिवस बंद राहणार ‘हा’ रस्ता; पर्यायी मार्ग पाहून घ्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय (एफ सी) रोड ने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजपासून पुढील नऊ दिवस हा मार्ग अंशत: बंद राहणार आहे. आजपासून 21 डिसेंबरपर्यंत एफ.सी रोडवर आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. एफ.सी रोडवरून न जाता, पर्यायी रस्ता मार्ग वापरण्याचे पोलिसांनी आवाहन केलं आहे.

का करण्यात आलाय बदल?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन कॉलेज येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरीता व्हीव्हीआयपी, व्हीआयपी तसेच पुणे शहर परिसरातील शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि नागरीक असे मिळून अंदाजे मोठा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाचे अनुषंगाने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने या रस्त्यावरील वाहतुकीत आवश्यकते नुसार बदल करणे गरजेचे आहे.

 

पाच महत्त्वाचे बदल

जंगली महाराज रोड व फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

1. जंगली महाराज रोडने कर्वे रोड करीता बालगंधर्व डावी कडे वळून, नदीपात्र रोडने, महादेव मंदीर येथून इच्छित स्थळी.

2. कर्वेरोड कडून एफ. सी. कॉलेज रोडने शिवाजीनगर कडे जाण्याकरीता कर्वे रोड नळस्टॉप, लॉ कॉलेज रोडने, सेनापती बापट रोडने इच्छित स्थळी

3. पुस्तक महोत्सव करीता येणारे नागरीकांसाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. 3 संत तुकाराम महाराज पादुका चौक येथून दुचाकी चारचाकी / बस इत्यादी वाहनांना एफ. सी. कॉलेज मधील पार्किंग ग्राऊंड करीता प्रवेश देण्यात येणार आहे.

4. पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरिकांनी बाहेर जाण्याकरीता एफ. सी. कॉलेज गेट नं. 4 चा वापर करावा.

5. पुस्तक महोत्सव करीता येणाऱ्या नागरीकांनी फक्त पायी जाण्यासाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. 2 चा वापर करावा.

पुणे पुस्तक महोत्सव 2025 बद्दल थोडक्यात:

पुणे पुस्तक महोत्सव 2025 हा राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी इंडिया) द्वारे आयोजित केला जातोय. यंदाची ही तिसरी आवृत्ती आहे. आज (13 डिसेंबर 2025) पासून सुरू होत असलेल्या या महोत्सवाची मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे.

महोत्सवाच्या तारखा: 13 ते 21 डिसेंबर 2025 (9 दिवस).

वेळ: सकाळी 11 ते रात्री आठ वाजेपर्यंत

ठिकाण: फर्ग्युसन कॉलेज ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे 411004.

प्रवेश: पूर्णपणे मोफत. कोणत्याही तिकिटाची गरज नाही.

विशेष आकर्षणे: 600 हून अधिक पुस्तक स्टॉल्स, ज्यात विविध भाषांतील (10+ भाषा) पुस्तके उपलब्ध असतील. मागील वर्षी 40 कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली होती.

500 हून अधिक लेखक आणि वक्ते सहभागी. लेखक भेटी, वाचन सत्रे, कविता वाचन, आणि सांस्कृतिक कार्यक्रम.

बाल विभाग: बालकांसाठी कथा सांगणे, कार्यशाळा आणि खेळ.

लाइव्ह कॉन्सर्ट: 14 डिसेंबरला थायकुडम ब्रिजचा लाइव्ह परफॉर्मन्स (संध्याकाळी 7 ते 9 दरम्यान, प्रवेश: मोफत).

फोटो स्पर्धा: ‘जॉय ऑफ रीडिंग’ फोटो स्पर्धा, ज्यात पुस्तक वाचनाचे फोटो पाठवून भाग घेता येणार.

10% सूट: सर्व वाचकांसाठी पुस्तकांवर 10% सूट.

अन्य: लिटररी ट्रेझर हंट (संकेत शोधणे आणि बक्षिसे), आणि #MyBookMyStory मोहीम ज्यात वाचन कथा शेअर करा.

दैनंदिन कार्यक्रम: लेखक चर्चा, वर्कशॉप्स, आणि सांस्कृतिक शो. तपशील अधिकृत वेबसाइट किंवा ‘एनबीटी इंडिया’च्या सोशल मीडिया वर उपलब्ध.

सहभागी आणि भागीदार: आयोजक: राष्ट्रीय पुस्तक न्यास (‘एनबीटी इंडिया’), समर्थ युवा फाउंडेशन आणि इतर.

सहभागी प्रकाशक: मागील वर्षी 700 हून अधिक, यंदाही तसेच अपेक्षित.

admin
Author: admin

और पढ़ें