आशिया आणि जगातील सर्वात मोठी GCC मुंबईत करण्याचा निर्णय ब्रुकफिल्डने घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
“मी आताच चर्चा ब्रुकफिल्डसोबत चर्चा केली असून, महत्त्वाची चर्चा झाली आहे. आशिया किंवा जगातील सर्वात मोठी GCC मुंबईत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे”.
“GCC 20 लाख स्क्वेअर फूट असणार आहे. 15 हजार लोकांना थेट आणि 30 हजार लोकांना अप्रत्यक्ष नोकरी मिळणार आहे. महाराष्ट्राला जीसीसी कॅपिटल करण्याच्या दृष्टीने सकारात्मक बैठक झाली आहे. लवकरच त्यासंदर्भात आम्ही एमओयू देखील करु,” असं फडणवीसांनी सांगितलं आहे.
“लॉजिस्टिकमध्ये प्रथितयश कंपनी समजाली जाणारी FEDEx शी जीसीसी संदर्भात चर्चा झाली. तीदेखील सकारात्मक चर्चा झाली आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं आहे.
“जीसीसीच नाहीतर वेगवेगळे ऑपरेशन्स मुंबई, आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात आणण्यासंदर्भात चर्चा झाली आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात सत्या नडेला यांनी संबोधित करताना मी हजर होतो. त्यांनी महाराष्ट्रासोबत प्लॅटफॉर्म तयार केला आहे, त्याची फिल्मदेखील दाखवली. AI चा वापर करुन कशाप्रकारे गुन्हा नियंत्रित करु शकतो याचं जे उदाहरण तायर केलं आहे ते दाखवण्यात आलं,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.
“सत्या नडेला यांच्यासोबत समोरासमोर बैठक झाली असता, इतर क्षेत्रातही एआयचा कसा वापर करता येईल आणि एआय को पायलट्स कसे करता येतील यासंदर्भात चर्चा झाली. हेल्थकेअर, शिक्षण, कृषी या प्रत्येक क्षत्रेत्रात कशाप्रकारे को पायलट्स करता येतील यावर बोलणं झालं,” असं फडणवीसांनी सागितलं आहे.
“पंतप्रधानांना भेटून मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्राचाही गुंतवणुकीसाठी विचार करा असं मी त्यांना म्हटलं आहे. आम्ही ज्या ठिकाणांचा विचार करत आहोत त्यात महाराष्ट्र प्रामुख्याने आहे असं ते म्हणाले आहेत. येत्या काळात खूप चांगली गुंतवणूक आणि तांत्रिक सपोर्ट आणि महाराष्ट्राला एआय हब करणयासाठी मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल असी चर्चा झाली,” असं फडणवीस म्हणाले आहेत.









