महाराष्ट्रात महिन्याभरापूर्वी म्हणजेच 28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी आली आणि या दुर्घटनेचा एक महिना पूर्ण होत असतानाच आणखी एका भयंतर विमान अपघाताचं वृत्त जगाला हादरवून गेलं. बोलिवियाची राजधानी ला पाजनजीक असणाऱ्या एल अल्टो शहरामध्ये 27 जानेवारी रोजी वायुदलाचं हरक्यूलिस सी130 हे विमान भयंकर दुर्घटनेमध्ये जळून खाक झाल्याची घटना घडली. प्राथमिक वृत्तानुसार या अपघातात 15 जणांचा मृत्यू ओढावला, तर 30 जण जखमी झाले.
अपघाताचे व्हिडीओ विचलित करणारे…
रॉयटर्सच्या माहितीनुसार बोलिवियन वायुदलाचं सी-130 हरक्यूलिस विमान देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहरात कोसळून 30 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचे अनेक विचलित करणारे व्हिडीओ व्हायरल झाले असून, विमानातून एका बँकेच्या नव्या चलनी नोटा देशाच्या दुसऱ्या भागात नेण्यात येत होच्या. मात्र, Plane Crash नोटा रस्त्यावर विखुरल्या, तर काही जळून खाक झाल्या. हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, विमानतळ तातडीनं अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं.
स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ही दुर्घटना 6 वाजण्याच्या सुमारास घडली. हे विमान रनवेवरून अनियंत्रित झालं आणि विमानतळाची सीमा सुरक्षा जाळी तोडून थेट महामार्गावर जाऊन आगळलं. अनेक वाहनांना हे विान धडकल्यामुळं वाहनांतंही मोठं नुकसान झालं. ही दुर्घटना इतक्या भीषण स्वरुपाची होती, की मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बोलिवियन पोलीस आणि अग्निशामक दलानं घटनेची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी दाखल होत नागरिकांपर्यंत मदतकार्य पोहोचवलं. या विमानातून नेमके कितीजण प्रवास करत होते आणि त्याबाबतची अधिक माहिती अद्यापही प्रतीक्षेत आहे. दरम्यान, बोलिवियन वायुदलाकडूनही या अपघातासंदर्भात कोणतंही अधिकृत वृत्त समोर आलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.








