Search
Close this search box.

Manobala Passes Away: साऊथ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोबाला यांचे निधन; वयाच्या 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि दिग्दर्शक मनोबाला (Manobala) यांचे चेन्नई (Chennai) येथे निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील साळीग्रामम येथील एल.व्ही.प्रसाद रोडवरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. दिवंगत मनोबाला यांच्या पश्चात पत्नी उषा आणि मुलगा हरीश असे कुटुंब आहे.

मनोबाला यांच्या निधनानं तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता-दिग्दर्शक जीएम कुमार आणि रमेश बाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.

मनोबाला यांनी 450 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं

मनोबाला यांनी त्यांच्या कॉमेडी टायमिंगमुळे विशेष ओळख निर्माण केली होती. चित्रपटसृष्टीतील 35 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मनोबाला यांनी 1979 मध्ये भारतीराजाच्या पुथिया वरपुगल या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

admin
Author: admin

और पढ़ें