Search
Close this search box.

Tauktae चक्रीवादळ या वेगाने असे पुढे सरकणार, जास्त तडाखा कोकणला बसण्याची शक्यता

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणसह पालघर जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हे वारे ताशी 60 ते 70 वेगाने वाहणार आहेत. याचा फटका सर्वाधिक गोव्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ गोव्याच्या 350 किलोमीटर दूर आहे, 24 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत येईल, अशी माहिती कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली.

Tauktae चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात मासेमारांना अलर्ट केले आहे. सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग, रत्नागिरीला जाणवेल. 16 तारखेला रायगड मुंबई पालघर याठिकाणी परिणाम जाणवेल तर 18 तारखेला हे वादळ गुजरातच्या दिशेने विरावळ, पोरबंदर ते नलिया या किनारपट्ट्यांमध्ये धडकेल. 60 ते 70 प्रति किलोमीटर वाऱ्याच्या वेगामुळे झाडे आणि कच्च्या घरांची पडझड होईल, अशी शक्यता आहे. गुजरानंतर हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने कराचीकडे सरकणार आहे.

चक्रीवादळाबाबत मुंबई महापालिकेची बैठक
मुंबई महापालिका आयुक्त इक्बारसिंह चहल, सर्व सहायक आयुक्त , NDRF चे वरिष्ठ अधिकारी आणि शहर आणि उपनगर जिल्हा आपतकालिन विभागाचे वरीष्ठ अधिकारी तसेच नौदल अधिकारीही उपस्थितीत बैठकी झाली. ही बैठक VC व्दारे पार पडली. यावेळी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, मुंबईत आज ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत तर उद्या 60 ते 70 ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोविड सेंटरला पर्यायी विद्युत व्यवस्था
मुंबईत कोविड सेंटरला पर्यायी विद्युत व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गरज असेल तर रुग्ण हलवले जातील असे सांगण्यात आले आहेत. Ndrf आणि नेव्ही विभागाकडून गरज लागली तर मदत घेतली जाईल , या विभागाने आम्ही तयार असल्याचं म्हटले आहे.

सर्व समुद्र किनाऱ्यावर अलर्ट जारी
मुंबईत सर्व समुद्र किनाऱ्यावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत जोरदार वाऱ्यामुळे झाड पडली तर आणि पडलेली झाडे हटवण्याच्या अधिकाऱ्याना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, रत्नागिरी, (Ratnagiri)आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने मच्छिमारांना दिला आहे. दरम्यान, ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.