Search
Close this search box.

‘मला काहीही माहिती नाही’, अशोक खरात पहिल्यांदा बोलताच भुवया उंचावल्या; भोंदूबाबाची ED कोठडीत रवानगी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 लैंगिक शोषण, फसवणूक, खंडणी, ब्लॅकमेलिंग, काळी जादू आणि मनी लॉन्ड्रिंग असे गंभीर आरोप आणि अनेक गुन्हे दाखल असलेल्या भोंदू अशोक खरातला ईडीनं चौकशीसाठी मुंबईत आणलं ज्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या SIT आणि नंतर आता ED ने ही  खरातची चौकशी सुरु केली. ED नं या प्रकरणात खरातवर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला 20 मे 2026 सा ईडी PMLA कोर्टात हजर करण्यात आलं. जिथं खरातचा 26 तारखेपर्यंतची ईडी कोठडी सुनावण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे खरात यावेळी पहिल्यांदाच बोलला आणि त्याच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या.

70 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार, विविध बँक खात्यांमधील संशयास्पद आर्थिक उलाढाल आणि भक्त व व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याच्या संशयावरून इडी खरातची चौकशी करणार असल्याचं समजत आहे.

अशोक खरात कोर्टात पहिल्यांदा बोलला

कोर्ट- तुम्हाला पोलिसांबद्दल काही सांगायचे आहे का? 

खरात- हात जोडून मानेनंच नाही

असं करत ‘तुमच्यावर काय आरोप आहेत ते तुम्हाला कळतायत का?’ हे विचारल्यावर खरात उत्तर देत म्हणाला, ‘माझ्याकडे जे पैसे आले ते मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला सांगितले होते की असे असे पैसे आहेत माझ्याकडे. त्यावरून जे पैसे आले ते वेगवेळ्या अकाउंटमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी मला सांगितले. ही सहकारी बँक आहे आणि इथे व्याज 9 टक्कs मिळतं सांगत पैसे ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार जास्त व्याजापोटी मी पैसे बँकेत ठेवले होते’.

‘तुम्हाला सगळ्या अकाउंटला नॉमिनी करण्याचे कारण काय?’ असा प्रश्न केला असला ‘त्याबद्दल मला काहीही माहिती नाही’, असं उत्तर खरातनं दिलं. त्याच्या या उत्तरानं साऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

सुनावणीनंतर न्यायालयातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत माध्यमांशी संवाद साधताना खरातच्या वकिलांनी काही माहिती दिली. ‘ED नं 10 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र आता 6 दिवसांची ईडी कस्टडी दिली आहे. गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचं खरातनं काय केलं, याची तपासणी यंत्रणेला करायची असल्यामुळं ही कोठडी मागण्यात आली होती. मात्र रिमांड रिपोर्ट पाहिला तर 10 दिवसांच्या कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद आम्ही केला’, अशी माहिती खरातच्या वकिलांनी दिली.

दरम्यान न्यायालयात 5 करोड 60 लाखांच्या व्यव्हाराबाबत चौकशी करणं गरजेचं असून, त्यानं या पैशाचा वापर वाहने आणि फॉरेन ट्रीपसाठी केला होता, ‘त्यानं हे पैसे भगवान शंकर- लॉर्ड शिवा’च्या नावानं लोकांकडून घेतले असं ईडीनं न्यायालयात स्पष्ट केलं. तर, आरोपीने अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांकडून खंडणी वसूल केली आहे आणि मनी लाँड्रिंग केल्याचे आरोप तपास अधिकाऱ्यांनी दिली.

खरात प्रकरणी सुनावणी करत न्यायालय म्हणालं…

खरातच्या नावे बॅक ऑफ बडोदा मध्ये कोट्यवधींचे व्यव्हार झाले असल्याचं सांगत न्यायालयात खरातनं 60 बॅक खाती उघडली होती असं सांगताना यात नॉमिनी, बेनिफिशीअरी, कॉन्टॅक्ट नंबर अशोक खरातचा आहे ही बाब लक्षात आणून दिली. या व्यव्हाराचा उद्देश्य आणि स्त्रोत आम्हाला शोधायचा असून, 97 लाख वगळता बाकी रक्कम रोख स्वरुपात काढून घेण्यात आली, 23.87 कोटी रोकड स्वरुपात काढण्यात आले, या पैशांचा काय वापर झाला ते शोधायचं असल्याची निकड न्यायालयानं बोलून दाखवली.

admin
Author: admin

और पढ़ें