Search
Close this search box.

Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उजळाईवाडीमध्ये शेजारच्या घरावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलाचा उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. अफान असिफ बागवान (वय 13) असे मृत मुलाचे नाव आहे. काल शाळेला सुटी असल्याने तो सकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला. खेळताना चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीवर गेला. असिफ बाॅल आणण्यासाठी टेरेसवर गेला असता घराच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा त्याला संपर्क होताच जोराचा विद्युत धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या इमारतीवरून विमानतळाला पुरवठा करणारी उच्चदाब वाहिनी जाते.

घटना नेमकी कशी घडली?

उजळाईवाडीतील बालाजी पार्क येथे अफान आपल्या कुटुंबासोबत राहत होता. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अफानला शिक्षकांच्या सुरू असलेल्या संपामुळे शुक्रवारी शाळेला सुट्टी होती. त्याचा मित्रासह खेळत असताना क्रिकेटचा चेंडू शेजारील घराच्या छतावर गेला. चेंडू आणण्यासाठी तो वर चढला असता घराच्या अगदी दीड ते दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारेला त्याचा संपर्क आला. क्षणात प्रचंड विजेचा धक्का बसल्याने तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.  वडील औद्योगिक वसाहतीत कामगार आहेत, तर आई गृहिणी. दोन बहिणीनंतर तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. अत्यंत मनमिळावू, हुशार आणि अभ्यासू स्वभावामुळे मोहम्मद सर्वांच्या आवडीचा होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने आई-वडील, कुटुंबीय आणि मित्रांचे अश्रू अनावर झाले. या अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महाप्रसादातून शंभर गावकऱ्यांना विषबाधा

दुसरीकडे, दत्त जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात ही घटना घडली. विषबाधित रुग्णांना गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सांबरे गावात दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद घेतला असता सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाल्याने उलट्याचा त्रास सुरु झाला. विषबाधा झालेल्या गावकऱ्यांवर नेसरी आणि परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. मात्र 30 ते 40 रुग्णांना अधिक उपचारासाठी गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

admin
Author: admin

और पढ़ें