Search
Close this search box.

‘सभागृहात भाषणं, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पण…’ राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सुनेत्रा पवारांची भावनिक साद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये अनेक घडामोडी पाहिल्या. मोठ्या पक्षांमध्ये मतभेद झाले, दुफळी माजली, पक्षाचे दोन भागही झाले. शरद पवार यांची राष्ट्रवादीसुद्धा यास अपवाद ठरली नाही. अजित पवारांनी आपली वेगळी वाट निवडत राज्याच राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात केली. मात्र नियतीनं या अष्टपैलू नेत्यावर घाला घातला आणि क्षणात सारंकाही होत्याचं नव्हतं झालं. पक्षाची जबाबदारी अजित पवारांच्या पत्नी आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री (Sunetra Pawar) सुनेत्रा पवार यांच्यावर आली. एका मातब्बर राजकारण्याचा वारसा पुढे नेताना सुनेत्रा पवार यांनीही स्वत:ला झोकून दिलं. मात्र, अजित पवारांची पोकळी तेव्हाही होती आणि आजही कायम आहे, हेच त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केलं.

राष्ट्रवादी (AP) च्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली. ज्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच अजित पवारांचं नसणं आणि मनातील एकंदर घालमेलसुद्धा DCM पवार यांनी शब्दांवाटे मांडली.

‘यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज अजित दादा आपल्यात नाहीत…’, असं म्हणत पक्षासाठी दादा नेमके कोण होते आणि कोण आहेत हे स्पष्ट केलं.

चूक झाली तर कान धरून समजावणारे…

‘सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया’, असं त्यांनी लिहिलं.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा पक्ष त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला. पक्षाच्या आतापर्यंतच्या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे हेसुद्धा त्यानी न विसरता नमूद केलं.

admin
Author: admin

और पढ़ें