Search
Close this search box.

Maharashtra Bhushan Award : ‘तुम्ही जेवून घ्या, कार्यक्रम संपल्यावर येते…’ पण ती माऊली घरी परतलीच नाही

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र्र भूषण कार्यक्रमात (Maharashtra Bhushan Award) 13 जणांचा मृत्यू (13 Death) झाला. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातून श्रीसदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. भर उन्हात लाखोंची गर्दी जमली होती. पण कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना उन्हाचा त्रास झाला. दुर्देवी उष्माघाताने (Heatstroke) 13 जणांचा मृत्यू झाला. काही जण रात्रीपासूनच तर काही जणं पहाटेपासून या कार्यक्रमासाठी नवी मुंबईत (Navi Mumbai) जमले होते.

मीनाक्षी मेस्त्रीही पहाटेच पोहोचल्या
वसईमधील 58 वर्षांच्या मीनाक्षी मिस्त्री यादेखील पहाटेच उठून कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या होत्या. पहाटे पाच वाजता उठून त्यांनी सर्वांसाठी जेवण बनवलं. घरातील सर्व झोपले असताना तीने कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर घरी फोन केला. जेवण तयार केलं आहे, तुम्ही सर्वजण जेवण घ्या, कार्यक्रम संपल्यावर घरी येते असा निरोप त्यांनी दिला. पण मिनाक्षी मिस्त्री यांचे तेच शब्द अखेरचे ठरले. कार्यक्रम संपल्यावर येते असं म्हणणाऱ्या मिनाक्षी घरी परतल्याच नाहीत.

मीनाक्षी मिस्त्री या अंगणवाडी सेविका म्हणून काम करायच्या. दुपारी पुरस्कार सोहळा पार पडला. पण रात्री उशीरापर्यंत मीनाक्षी मिस्त्री घरी परतल्या नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. त्यांचा फोनही लागत नसल्याचं घरचे घाबरले. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं, रात्री उशीरा त्यांना मीनाक्षी मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

मृत्यू उष्माघाताने नाही तर?
पण आपल्या बहिणीचा मृत्यू उष्माघाताने झाला नसल्याचा नसून चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा दावा मीनाक्षी मिस्त्री यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मीनाक्षी यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या असल्याने नक्की तिकडे काय झाले आहे हे कळायला मार्ग नाही , प्रशासनाने व्यवस्था नीट केली नसल्याने हे घडल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत.

खारघरमधल्या गुलाब पाटील यांचाही मृत्यू
खारघर दुर्घटनेतील बळी पडलेल्या गुलाब पाटील या विरार गावातील रहिवासी. गावातील आणि कुटुंबातील लोक आप्पासाहेब धर्माधिकारींच्या बैठकीला हजेरी लावणारे. अप्पासाहेबांना पुरस्कार मिळणार म्हणून वसई मधून पाच बस शनिवारी रात्री निघाल्या गुलाब पाटील देखील यात होत्या. रात्रीच त्या खारघर मधील मैदानात येऊन बसल्या. इतर महिला देखील सोबत असल्याने गुलाब पाटील यांचं कुटुंब निश्चिंत होतं. पण त्या घरी आल्या नाहीत त्याचा फोन आणि पर्स खाली पडलेली आढळली. त्यांना कामोठ्यातल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.