Search
Close this search box.

Chrisann Pereira Arrested : ‘सडक 2’ आणि ‘बाटला हाऊस’ फेम अभिनेत्रीला अंमली पदार्थांच्या तस्करीत दुबईत अटक!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

‘सडक 2’ आणि ‘बाटला हाऊस’ फेम अभिनेत्री क्रिसन परेराला (Chrisann Pereira) संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली आहे. क्रिसनला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. क्रिसनला अटक केल्यानंतर शारजाह मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. तुम्हाला प्रश्न असेल की ही माहिती कशी समोर आली असेल. तर भारतीय दूतावासांनी क्रिसनच्या अटकेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली आहे. तर तिच्या कुटुंबानं ती आरोपी नसून पीडित असल्याचं म्हटलं आहे.

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, क्रिसनच्या कुटुंबाचं म्हणणे आहे की यात त्यांच्या मुलीला फसवण्यात आलं आहे. तर क्रिसनचा भाऊ केव्हिन म्हणाला, ‘आम्ही गेल्या दोन आठवड्यांपासून इमोशन्ल छळाचा सामना करत आहोत. माझी बहीण निर्दोष आहे आणि तिला ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकवण्यात आलं आहे.’ तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, क्रिसन जेव्हापासून शारजाह विमानतळावर उतरली तेव्हापासून ते तिच्याशी बोलू शकले नाहीत.

क्रिसनच्या भावानं पुढे सांगितलं की इंडियन कॉन्स्यूलेटनं त्यांना 72 तासांनंतर माहिती दिली की तिला अटक करण्यात आली आहे आणि इतकंच काय तर तिला शारजाह मध्यवर्ती कारागृहात कैद करण्यात आलं आहे. तर क्रिसनला रवी नावाच्या व्यक्तीने फसवले. त्यानं सगळ्यात आधी कृष्णाची आई प्रेमिले परेरा यांच्याशी संपर्क साधला. रवी नावाच्या या व्यक्तीने सांगितले की तो एका इंटरनॅशनल वेब सीरिजसाठी कास्ट करत आहे. आईने रवीची ओळख कृष्णाशी करून दिली. काही भेटीनंतर दुबईत वेब सीरिजसाठी ऑडिशन होणार असल्याचे त्यानं सांगितले होते. तर तिच्या प्रवासाचे संपूर्ण बुकिंग रवीने केले होते.

क्रिसनच्या आईने सांगितले की, दुबईला जाण्यापूर्वी रवीने क्रिसनला एक ट्रॉफी दिली. तो स्क्रिप्टचा भाग असल्याचे त्याने सांगितले. या ट्रॉफीमुळेच क्रिसनला विमानतळावर अधिकाऱ्यांनी पकडले तेव्हा त्यातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. यानंतर 10 एप्रिल रोजी पोलिसांनी अभिनेत्रीवर ड्रग्ज तस्करीचे आरोप लावले. दरम्यान, रवी नावाची व्यक्ती सध्या बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : बॉलिवूड अभिनेत्री Mahima Chaudhry च्या आईचं निधन!

क्रिसनच्या कुटुंबानं पुढे सांगितले की त्यांनी दुबईत तिच्यासाठी एक वकील नेमला आहे. कुटुंबानं पुढे सांगितलं की वकिलाची फी ही 13 लाख रुपये आहे आणि त्यांच्या मुलीला सुखरुप परत आणण्यासाठी घरदेखील गहाण ठेवायला तयार आहेत. कारण यासाठी दंड हा 20-40 लाख रुपये आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.