Search
Close this search box.

MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दुष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मनसेकडून शिवाजी पार्क येथील दिवाळीच्या निमित्त करण्यात येणारी रोषणाई अखेर अधिकृत रित्या रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ स्थितीमुळे मनसेने घेतला निर्णय घेतल्याची माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे. आमचा पक्ष लहान असला तरी रोषणाई आणि आतिशबाजी यावर्षी करणार नसल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. शिवाजी पार्क येथे केवळ कंदील लावून साधेपणानं दिवाळी साजरी केली जाणार असल्याचं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून दरवर्षी रोषणाई आणि आतिश बाजीकरत दीपोत्सव साजरा केला जातो. पण यंदा दीपोत्सवातील रोषणाई-आतिषबाजी रद्द करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. महाराष्ट्रावर असलेल्या दुष्काळ संकटामुळे हा निर्णय घेतला असल्याचं मनसेच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रात सध्या दुष्काळ परिस्थिती आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथील रोषणाई आणि अतिशबाजी यंदा आम्ही करणार नाही. गंभीर परिस्थिती असल्यामुळे केवळ साधेपणाने शिवाजी पार्कवर दिवाळी साजरी करणार आहोत. यावर्षी शिवाजी पार्कवर फक्त कंदील लावून आम्ही दिवाळी साजरी करणार असल्याचं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं.

यशवंत किल्लेदारांचं अमित साटम यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर

एकीकडे एकाच मंचावर आशिष शेलार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना हसून खेळून वातावरण होतं. मग दुसऱ्या दिवशी अमित साटम यांना राज ठाकरेंवर बोलण्याची काय गरज होती.  साटम यांच्याकडून कोणत्या मुद्द्याच्या आधारे पाकिस्तानी एजंट वगैरे सारखी टीका केली गेली. साटम यांनी आमच्यावर टीका करण्याऐवजी मुंबई भाजपमध्ये उभी फूट पडलेली आहे ती आधी पाहावी.अमित साटम यांना कोण उभ करत नाही, त्यांना विचारत नाही, असा टोला यशवंत किल्लेदार यांनी लगावला. साटम यांनी आधी त्यांच्या पक्षात असलेली फूट आणि वाद पाहावा मग आमच्यावर टीका करावी, असं प्रत्युत्तर यशंवत किल्लेदार यांनी दिलं.

कुंभमेळा साधेपणानं करावा

नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी वारे माप खर्च केला जात आहे. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आधीच झालेले आहेत. तरीदेखील इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून कुंभमेळ्याचे आयोजन केलेलं आहे. आधीच महाराष्ट्र दुष्काळात आहे त्यात गरीब शेतकऱ्यांना मदत ही केवळ 5000 रुपयांचीच केलेली आहे आणि कुंभमेळासाठी कोट्यावधीचे टेंडर काढले जात आहे त्याची गरज नाही, असं यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केलं. आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही मात्र टेंडर काढून जो खर्च मोठ्या प्रमाणात केला जात आहे, त्याला विरोध आहे. साधेपणाने कुंभमेळा साजरा केला जाऊ शकतो. जर आम्ही लहान पक्ष असून दुष्काळी परिस्थिती म्हणून आतिषबाजी आणि रोषणाई रद्द करू शकतो तर तुम्ही तर सत्ताधारी आहात मोठा पक्ष आहात, तुम्ही देखील ते करु शकता, असं यशवंत किल्लेदार म्हणाले.

admin
Author: admin

और पढ़ें