Search
Close this search box.

Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Film Industry) स्टायलिश ॲक्शनचा बादशहा, निर्माते-दिग्दर्शक संजय गुप्ता (Producer-Director Sanjay Gupta) यांचं निधन झालंय. ‘काँटे’, ‘मुसाफिर’ आणि ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ (Shootout at Lokhandwala) यांसारख्या सिनेमांसाठी संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांना ओळखलं जायचं. मीडिया रिपोर्टनुसार, रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांना डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून आतापर्यंतच्या तपासात संशयास्पद काहीही आढळलेले नाही, अशी माहिती समोर आली आहे. सिनेनिर्माते अशोक पंडित यांनीही संजय गुप्ता यांच्या निधनाची माहिती पोस्ट करत दिली आहे. त्यात त्यांनी डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे संजय गुप्ता यांचं निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, क्राइम सिनेमामधल्या आपल्या स्टायलिश अॅक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या निर्मात्या, दिग्दर्शकाच्या मृत्यूनं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

बॉलिवूडचे (Bollywood News) प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता (Director Sanjay Gupta) यांचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संजय गुप्ता त्यांच्या मुंबईतील घरात पाय घसरुन पडले. संजय गुप्ता यांचं 30 ऑक्टोबर रोजी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. तरी, असं सांगितलं जातंय की, संजय गुप्ता त्यांच्या राहत्या घरात रात्री 30 ऑक्टोबर रोजी बाथरूममध्ये पाय घसरुन पडले. पण, त्यानंतर ही घटना सकाळपर्यंत (शनिवार, 31 ऑक्टोबर) कोणाच्याही लक्षातच आली नाही. पाय घसरुन पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली. यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.

NDTV नं दिलेल्या वृत्तानुसार, ज्यावेळी निर्माते, दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. त्यावेळी त्यांच्या घरात ते स्वतः, पत्नी आणि त्यांची दोन मुलं उपस्थित होती. पण, मध्यरात्री घटना घडल्यानं कुणालाच त्याबाबत समजलं नाही. सकाळपर्यंत कुटुंबीय संजय गुप्ता यांच्यासोबत झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत अनभिज्ञ होते. सकाळी सर्वांच्या लक्षात हा प्रकार लक्षात आला. पण, तोपर्यंत फार उशीर झालेला आणि या दुर्दैवी घटनेत संजय गुप्ता यांचं निधन झालं.

संजय गुप्ता हे बॉलिवूडमधील एक दिग्गज नाव असून ते सुप्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक होते. संजय गुप्ता प्रामुख्यानं अमेरिकन ॲक्शन-थ्रिलर आणि क्राईम सिनेमांच्या रिमेकसाठी ओळखले जायचे. त्यांच्या उल्लेखनीय सिनेमांमध्ये ‘आतिश’, ‘काँटे’, ‘काबिल’, ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’, ‘शूटआउट ॲट वडाला’, ‘जज्बा’, ‘करम’, ‘जिंदा’ आणि ‘मुंबई सागा’ यांचा समावेश आहे.

तीन दशकांच्या कारकिर्दीत अविस्मरणीय सिनेमांची निर्मिती 

संजय गुप्ता यांनी 1994 मध्ये ‘आतिश’ सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘राम शास्त्र’, ‘जंग’ आणि ‘खौफ’ सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं. मात्र, 2002 मध्ये प्रदर्शित झालेला आणि अत्यंत प्रशंसित ठरलेला ‘काँटे’ सिनेमा त्यांच्यासाठी बॉलिवूडमधील खऱ्या ओळखीचा स्रोत ठरलाय.

आपल्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ‘व्हाइट फेदर फिल्म्स’ (White Feather Films) ही निर्मिती संस्था स्थापन केली. लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता अशा विविध भूमिकांतून त्यांनी ‘झिंदा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारखे अनेक उल्लेखनीय सिनेमे प्रेक्षकांसमोर आणले.

admin
Author: admin

और पढ़ें