Search
Close this search box.

वसई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याने खळबळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव 2 दिवसापासून बेपत्ता आहेत. वसई विरार महापालिकेत मागच्या एक वर्षांपासून कोरोना रुग्णांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता. प्रेमसिंग जाधव यांनी सहाय्यक आयुक्त पदावरून वसई विरार शहरातील अनेक अनाधिकृत बांधकाम ही भुईसपाट केलेली आहेत.

2 जून रोजी कामावारून सुटल्या नंतर ते घरी परत गेलेच नाहीत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात प्रेमसिंग जाधव बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेमसिंग जाधव यांचे शेवटचे लोकेशन विरार रेल्वे स्थानकातले असल्याचे कळाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्रेमसिंग जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने, महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले याविषयी आता पोलीस तपास करीत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम