स्पेनच्या कॅनरी बेटाच्या जवळ एक भीषण दुर्घटना घडली. स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट समुद्रात अडकली. या बोटीतील जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला. तर काहींची प्रकृती गंभीर आहे. ही बोट सुमारे 10 दिवस समुद्रात अडकली होती. यावेळी बोटीत 100 प्रवासी होते.
नेमकं काय घडलं?
26 नोव्हेंबरला स्पेनच्या कॅनरी बेटाजवळ ‘एल हिएरो’ बेटाजवळ या बोटीमध्ये 100 प्रवासी होते. ही बोट तब्बल 10 दिवस समुद्रात अडकली होती. त्यामुळे पाणी आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता. जेव्हा बचाव पथकाला ही बोट सापडली तेव्हा 14 जणांचा मृत्यू झाला. काही लोकानी तहान लागली म्हणून समुद्रातील खारे पाणी पिले. मात्र त्यांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर 84 जणांना सुरक्षित ला रेस्टिंगाच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले आहे.
हे स्थलांतरित प्रवासी कुठून आले होते?
हे स्थलांतरित प्रवासी पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल आणि गांबिया या देशांच्या किनारपट्टीवरून स्पेनच्या कॅनरी बेटाकडे निघाले होते. कॅनरी बेट अटलांटिक महासागर मधील आफ्रिकाच्या उत्तर-पश्चिमच्या जवळ आहे. तो स्पेनचा महत्वाचा हिस्सा आहे.
पश्चिम आफ्रिका येथील पर्वासि समुद्री मार्गे स्पेन पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र आफ्रिकेतून अटलांटिक महासागर पार करुन स्पेनमध्ये पोहोचण्याचा हा मार्ग जगातील सर्वात धोकादायक मार्गांपाइकी एक असल्याचे मानले जाते. समुद्रातील जोरदार प्रवाह, खराब हवामान आणि गर्दीच्या बोटी यामुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरतो.
आफ्रिकामधून निघालेली आणखी एक बोट बेपत्ता
आफ्रिकेतील सेनेगल देशातून स्पेनसाठी निघालेली आणखी एक बोट बेपत्ता झाली आहे. या बोटीवर अनेक तरुण मच्छीमारांसह अंदाजे 172 लोक होते. ही बोट 9 ते 10 नोव्हेंबर रोजी निघाली होती. दोन आठवड्याहून अधिक काळ लोटला तरी बोट अद्याप सापडलेली नाही आहे.
स्थानिक नेत्यांच्या माहितीनुसारआर्थिक अडचणी आणि मासेमारीच्या संधी कमी झाल्यामुळे तरुण युरोपला पोहोचण्याचा प्रयत्न करत आपला जीव धोक्यात घालत आहे. स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
कॅनरी बेटावर वाढता दबाव
स्पॅनिश गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर दरम्यान कणारी बेटांवर 24364 स्थलांतरित दाखल झाले. 2025 मध्ये ही संख्या 14690 होती. केवळ नोव्हेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत 11,000 हुन अधिक स्थलांतरित दाखल झाले.








