Search
Close this search box.

मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मध्य रेल्वेच्या मुंबई (Mumbai) लोकल मार्गावर आज सकाळपासूनच रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. ठाणे ते सीएसएमटी मार्गादरम्यान रेल्वेसेवा विस्कीळीत झाल्याने लोकल सेवा तब्बल 4 तासांहून अधिक काळ बंद होती. यावेळी, अनेक प्रवाशांनी लोकल (Local) रेल्वे थांबलेल्या ठिकाणीच ट्रेन सोडून ट्रॅकवरुन मार्ग काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भांडुप स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर भीषण दुर्घटना (Accident) घडली असून एका प्रवाशांचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला आहे. 21 वर्षीय साहिल थिटे या तरुणाचा मृत्यू झाला असून साहिल हा मुलुंड कॉलनीमधील अमर नगर परिसरात वास्तव्यास होता.

भांडुप रेल्वे स्थानकाजवळील 4 नंबर प्लेटफॉर्मवरून 3 नंबर प्लेटफॉर्मवरील लोकल पकडण्यासाठी जात असताना एका प्रवाशाचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या घटनेनंतर प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सकाळपासूनच लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवासी तब्बल 3 ते 4 तास अडकून पडल्याने संतप्त झाले आहेत. सिग्नलच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची सेवा अद्यापही पूर्वत झालेली नाही. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील लोकल अतिशय धीम्या गतीने धावत असून परतीचा प्रवास करणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्याचा फटका बसतोय. सोमवारी सकाळी विक्रोळी आणि भांडुप दरम्यान सिग्नलिंग यंत्रणेच्या खोलीत अचानक आग लागल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला, बराचवेळ लोकल खोळंबल्यामुळे भर उन्हात रुळावर उतरवून चालण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. कित्येक प्रवाशांनी रेल्वे रुळावरुन बाहेरचा रस्ता गाठत सिटी बस, रिक्षा किंवा कॅबने प्रवास करत आपलं ऑफिस गाठलं. मात्र, यादरम्यान, भांडुपमध्ये लोकलच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू झाल्याची देखील दुर्घटना घडली.

दरम्यान, मध्ये रेल्वेच्या 4 पैकी 3 मार्गिकेवरील सिग्नल दुरुस्त करुन सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणारी धीमी मार्गिका अद्याप बाकी होती, तीचे कामही रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते.

admin
Author: admin

और पढ़ें