Search
Close this search box.

FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई आणि पुण्यासह (FDA Action on Vaishali Roopali Hotel)राज्यातील अनेक शहरांमधील मोठमोठ्या व नामांकित हॉटेल्सवर एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. याच मोहिमेअंतर्गत सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी एफडीएच्या (FDA Action on Vaishali Roopali Hotel) पुणे विभागाने शिवाजीनगरमधील फर्ग्युसन कॉलेज (एफ. सी.) रोड येथील ‘मेसर्स हॉटेल वैशाली’ आणि ‘मेसर्स रूपाली रेस्टॉरंट’ या दोन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कठोर कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने या दोन्ही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित (Forthwith Suspension) करण्यात आले आहेत.(FDA Action on Vaishali Roopali Hotel)

हॉटेल वैशालीमध्ये स्वयंपाकघरातील अपुऱ्या जागेमुळे अत्यंत अस्वच्छ व धोकादायक परिस्थितीत अन्नप्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आले. येथे कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर थेट महिलांच्या स्वच्छतागृहाच्या लगत, तर डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या अगदी जवळ ठेवण्यात आला होता. इतकंच नव्हे तर धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलावरच ठेवलेली आढळली.(FDA Action on Vaishali Roopali Hotel)

admin
Author: admin

और पढ़ें