लालबागचा राजा फिरून प्रवेशद्वारासमोर आला असून पुढे तो श्रॉफ बिल्डिंगकडे जात आहे. तेथे श्रॉफ बिल्डिंगवरुन राजावर पुष्पवृष्टी होणार आहे. येथील पुष्पवृष्टीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते
गिरगाव चौपाटी परिसरात मोठ्या गणेश मूर्ती दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, तेजूकाया मॉन्शनचा गणपती, काळाचौकीचा महागणपती, करिरोडाचा कैवारी गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झाले आहेत. भरतीची वेळ गाठायची असल्याने विसर्जन मिरवणूक लवकर सुरू केल्याची माहिती मंडळांच्या वतीने देण्यात आली आहे.






