Search
Close this search box.

‘भुलेश्वरचा राजा’ची मुर्ती कोसळून दोघांच्या मृत्यूनंतर ‘लालबागचा राजा’, ‘मुंबईचा राजा’चा एकत्रितपणे मोठा निर्णय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतील भुलेश्वर येथे शनिवारी ‘भुलेश्वरचा राजा’ गणपती मंडळाची मुर्ती मंडपात नेत असताना झालेल्या अपघातामध्ये मुर्ती पडून दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला. एकीकडे हा अपघात कसा झाला यावरुन स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी यांनी रस्त्यावरील खड्ड्यांना दोष दिला असून अग्निशमन दलाने मात्र ट्रॉलीच्या रॉडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुर्ती कोसळल्याचं म्हटलं आहे. एकीकडे हा वाद सुरु असतानाच दुसरीकडे मुंबईतील ‘लालबागचा राजा’ मंडळाबरोबरच गणेश गल्ली (मुंबईचा राजा) मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

गणेश गल्ली (मुंबईचा राजा) मंडळाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन या नव्या निर्णयाची माहिती देणाऱ्या पोस्ट करण्यात आल्या आहेत. “भुलेश्वर येथे घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या कठीण प्रसंगी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली (मुंबईचा राजा), भुलेश्वरचा राजा मंडळासोबत एका कुटुंबासारखे खंबीरपणे उभे आहे. गणेशभक्तांवर ओढवलेले हे दुःख आमचेही आहे, आणि या संकटात आम्ही सर्वजण एकत्र आहोत,” असं म्हटलं आहे.

किती निधी दिला?

“याच बंधुभावातून आणि आपले एक कर्तव्य म्हणून, या कठीण काळात मंडळाला एक छोटासा आधार देण्यासाठी ‘मुंबईचा राजा’तर्फे ‘भुलेश्वरचा राजा’ मंडळाकडे तीन लाख रुपयांचा आधार निधी सुपूर्द करण्यात येत आहे. या संकटातून सावरण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहो,” असंही गणेश गल्लीच्या (मुंबईचा राजा) मंडळाच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘भुलेश्वरचा राजा’ मंडळासोबत काय घडलं?

शनिवारी रात्रीच्या सुमारास भुलेश्वरच्या राजाचा आगमन सोहळा होता. आगमन सोहळ्यादरम्यानच बाप्पाची 22 फूट मूर्ती कोसळून मोठी दुर्घटना घडली. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशउत्सव मंडळाचा गणेश मूर्ती आगमन सोहळा सुरू असताना 22 फूट उंच मूर्ती पटांगण परिसरात अचानक तोल गेल्याने कोसळली होती. या दुर्घटनेत मंडळाच्या 7 जण जखमी झाले होते. त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जणांवर उपचार सुरू आहेत. भीषण दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. 33 वर्षीय संकेत मंडळाचा अध्यक्ष होता तर 30 वर्षीय ब्रिजेश सदस्य होत्या. मागील काही वर्षापासून दोघेही मंडळाचे काम करत होते. मात्र शनिवारी झालेल्या दुर्घटनेमध्ये या दोघांवर काळाने घाला घातला. ब्रिजेश जोशी विवाहित होता. त्याला 2 वर्षांचा मुलगा आहे. ब्रिजेश मूर्तीच्या समोरच होता. त्यामुळं मूर्ती जेव्हा कोसळली तेव्हा तो खाली दबला गेला, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें