Search
Close this search box.

Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संघाच्या प्रशासकीय काळातील तोटा भरून काढण्यासाठी गोकुळ दूध संघाने इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दूध दरवाढ केली. म्हशीच्या दरामध्ये सहा रुपये तर गाईच्या दरामध्ये (Gokul milk Rate) चार रुपये विक्रीमध्ये वाढ केली आहे. प्रशासक काळामध्ये गोकुळ दूध संघाला तब्बल 28 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं समोर आलं आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये होणारी दुधाची टंचाई यामुळे गोकुळ दूध संघाकडून दरवाढ केल्याचं अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितलं. तर याबाबत आता काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil on Gokul milk Rate) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सतेज पाटलांनी म्हटलं की, शेतकऱ्यांना दरवाढ मिळावी ही सगळ्यांची भूमिका राहिली आहे, मात्र मूळ मुद्दा हा आहे की प्रशासकाच्या काळात झालेला तोटा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा तोटा मोठ्या प्रमाणात झाला होता, जी तूट आहे, त्याबाबत चर्चा करावी लागेल, पुढच्या बैठकीत आमचे संचालक त्यावर चर्चा करतील असंही त्यांनी म्हटलंय.(Satej Patil on Gokul milk Rate)

दरवाढीवर अध्यक्ष राजेश पाटील यांची प्रतिक्रिया

गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी म्हटलं की, “कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांच्या वतीनं झालेल्या सर्व संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व संचालकांच्या संमतीनं दूध दरवाढ करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यामध्ये म्हैस दुधाला आपण साधारण 6 रुपयाची दरवाढ करत आहोत आणि गाय दुधाची आपण 4 रुपयाची दरवाढ करत आहोत. हे विक्रीची आहे आणि त्याचबरोबर जे खरेदी दर आहे त्यामध्ये मला वाटतंय आजपर्यंत गोकुळनं किंवा दूध संघानं जी म्हैस दुधासाठी दरवाढ दिलेली आहे ती ऐतिहासिक मला वाटतं या वेळेला सर्व संचालक मंडळानं त्याला संमती दिली आणि म्हैस दूध दरवाढीसाठी आपण 3 रुपये दूध उत्पादकांना दरवाढ देत आहोत आणि त्याचबरोबर गाय दुधाला आपण 2 रुपयाची दरवाढ करत आहोत. म्हणजे त्या दृष्टिकोनातून या दुष्काळ परिस्थितीवरती त्या शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय सर्व 25 संचालक मंडळ जे उपस्थित होतं त्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करून हा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे.

राजेश पाटील पुढे म्हणाले, हे दर साधारण 21 तारखेपासून लागू होत आहेत आणि ते त्या दृष्टिकोनातून साधारण आम्हाला 131 दिवस मार्च पर्यंतचे आपल्याला मिळतील आणि ते पुढे जी परिस्थिती उद्भवेल त्याचा दर महिन्याला आढावा घेतला जाईल आणि त्यामध्ये आणि सुद्धा जर काय परिस्थिती स्वरूपी जर काय निर्णय घ्यावे लागले ते त्या त्या वेळी संचालक मंडळ त्या संदर्भात विचार करेल कारण का आता जर परिस्थिती आपण बघितली तर सगळीकडेच राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा दुधाची उपलब्धता फार कमी होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या त्या वेळेला आपल्याला ते निर्णय घ्यावे लागतील.

सर्वसामान्य ग्राहक काहीसा नाराज

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ, वारणा दूध संघ यांच्यासह राज्य आणि देशभरातल्या दूध संघाने दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केली आहे. गोकुळ पाठोपाठ वारणा दूध संघाने देखील सहा रुपयाची वाढ विक्री दरामध्ये केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक काहीसा नाराज झाला आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात दर वाढ केल्याने महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आणखी फटका बसणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून हे दर कमी करावे अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.शिवाय दुधाऐवजी बिन दुधाचा चहा पिण्याचा विचार ग्राहकांकडून होत आहे. गोकुळ दूध संघामधील प्रशासक काळातील तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ केली असल्याने नागरिकांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना केवळ तीन रुपये देऊन ग्राहकांच्या माथ्यावर सहा रुपये दरवाढ करणे योग्य नाही अशा प्रतिक्रिया कोल्हापूरकरांनी दिल्या आहेत.

गोकुळ दूध संघ

गोकुळ दूध संघाचा कोल्हापूरमध्ये आधी प्रतिलिटर ७२ रुपये इतका दर होता तो आता 78 रुपये पोहोचला आहे

तर पुणे आणि मुंबई या ठिकाणी गोकुळचा प्रतिलिटर 78 रुपये दर होता तो आता 84 रुपये पोहोचला आहे

वारणा दूध संघ

वारणा दूध संघाचा कोल्हापूरमध्ये प्रतिलिटर 72 रुपये दर होता तो आता 78 रुपये पोहोचला आहे

तर पुणे आणि मुंबई या ठिकाणी वारणेचा दर 78 रुपयावरून 84 रुपयांवर पोहोचला आहे

अमुल दूध

अमोलच्या अमूल गोल्ड दुधाची प्रति लिटर 72 रुपये इतका दर होता तो आता 76 रुपये इतका झाला आहे

मदर डेअरी

मदर डेअरी चे फुल क्रीम दूध प्रति लिटर 72 रुपये होते ते आता 76 रुपयांवर पोहोचले

admin
Author: admin

और पढ़ें