Search
Close this search box.

आखाती देशांमधील महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी शासनाच्या आपत्कालीन सूचना; हेल्पलाईन क्रमांकांवर तातडीनं साधा संपर्क

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इस्रायल-इराण युद्धाचा भडका उडाल्यामुळं संपूर्ण जग चिंतेत असून, अमेरिका-इस्रायलचा इराणवर शक्तिशाली प्रहार झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं युद्धजन्य परिस्थितीदरम्यानच हवाई हल्ल्यात इराणचे 48 मोठे नेते ठार झाले असून, इराणी सशस्त्र दलाच्या प्रमुख अब्दुलरहीम मौसावीचा खात्मा झाल्याचा दावा अमेरिकेनं केला असून, इराणवरील हल्ले सुरूच ठेवणार असंच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

दुबई, यूएईमध्येमध्येसुद्धा तणावाची परिस्थिती

फक्त इराण नव्हे तर, दुबई, यूएईमध्येमध्येसुद्धा तणावाची परिस्थिती असून इराणकडून हवाई हल्ले सुरू असल्यानं इथं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शाहेद-136 ड्रोनने जोरदार हल्ले सुरू असल्यानं इथं प्रशासनाकडून अलर्ट जारी करत नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उत्तर इस्रायलकडे होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून, आयडीएफ लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. लेबनॉनमधील दक्षिण बेरूतमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आहे. व्हिडिओमध्ये एक बहुमजली इमारत उध्वस्त झाल्याचे दिसून आले आहे. याचदरम्यान आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक अडकल्यामुळं आणि तिथं अनेक नागरिक वास्तव्यास असल्यामुळं या सर्वच भारतीयांसाठी शासनानं आपत्कालीन सूचना जारी केल्या आहेत.

 

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाच्या स्पष्ट सूचना

पश्चिम आशियांसह आखाती देशांमध्ये वास्तव्यासह पर्यटन आणि इतर कारणांनी गेलेल्या, तसंच युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या. राज्य आत्पकालीन कार्य केंद्राकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

परराष्ट्र व्यवहार खात्यासह विविध दूतावासांनी चोवीस तास आपात्कालीन हेल्पलाईन क्रमांक सुरू केले असून, राज्य शासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सद्यस्थिती पाहता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना दूतावासाकडून दिल्या जात असून नागरिकांनी या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन यंत्रणांनी केलं आहे.

परदेशात अडकलेल्या नागरिकांसंदर्भातील माहितीसाठी, आपात्कालीन मदतीसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्र 24 तास सुरु राहणार असून नागरिकांनी 1077 (दोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधावा.
दूरध्वनी 97- 9321587143 / 022- 22027990
ई-मेल : controlroom@gov.in

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे गल्फ, मध्य-पूर्व देशांतील भारतीय दूतावासांचे देशनिहाय आपत्कालीन संपर्क क्रमांक-
कतार (दोहा) दूरध्वनी : 00974- 55647502/ 00974- 55647503
ई-मेल : cons, doha@mea. gov. in

संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी)
हेल्पलाईन क्रमांक- (दुबई) – टोल फ्री : 800-46342
व्हॉट्सअॅपः 971- 543090571
ई-मेल: pbsk. dubai@mea. gov. in
ई-मेल : ca. abudhabi@mea. gov. in

सौदी अरेबिया (रियाध / जेद्दाह) दूरध्वनी : 00-966-11-4884697
व्हॉट्सअॅप (फक्त) : 99-966-542126748
टोल फ्री : 800-247-1234
ई-मेल :cw.riyadh@mea. gov. in

बहारीन (मनामा) – दूरध्वनी : 00973-39418071
कुवेत दूरध्वनी : 965-65501946 (24*7 आपत्कालीन)
ई-मेल : community. kuwait@mea. gov. in

admin
Author: admin

और पढ़ें