Search
Close this search box.

अयानने मुलींना प्रेमात अडकवण्यासाठी घेतली लव्ह गुरूची मदत; त्या ‘फ्लॅट’मधील 4 भिंतीतला कृती ही …, शेजारच्याने सांगितली सगळी कहाणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात महिलांसोबतच्या लैंगिक अत्याचार प्रकरण महाराष्ट्रात गाजत असताना. अमरावतीमधील परतवाड्यातील व्हिडीओ कांडने महाराष्ट्राला हादरुन सोडलं आहे. या प्रकरणात पोलिसांना धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अमरावतीच्या कठोर नाका परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्याने अनेक मुलींसोबत अश्लील कृत्य केलं होतं. याच फ्लॅटमध्ये तो डर्टी पिक्चर बनवायचा. भयानक म्हणजे अयानने अमरावतीतील 2 आणि परतवाड्यातील 3 म्हणजे एकूण 5 कॅफेंनादेखील त्याचे अश्लील कृत्याचे अड्डा बनवला होता.

अयानने घेतली लव्ह गुरूची मदत!

अयान मुलींना प्रेमाच्या जाळ्यात कसा अडकवायचा यासाठी लव्ह गुरूची मदत घेत होता, अशी माहिती समोर आली आहे. या लव्ह गुरूने त्या कसं मुलींना प्रेमात पाडायचे याचे मंत्र दिले होते. त्याने सांगितलं होतं, मुलींना हाय हॅलो मेसेज करु नकोस. तर त्यांना असा प्रश्न विचार की ज्यामुळे त्यांना उत्तर देणं भाग पडेल.

या लव्ह गुरूच्या सांगण्यावरून तो मुलींना आप वहीं हो ना जो वहां मिले थे, असे मेसेज करुन त्यांच्याशी संवाद साधत होता.

admin
Author: admin

और पढ़ें