Search
Close this search box.

GT vs KKR IPL 2026 : ग्रीनची झुंज फिकी, गिलचा कहर! विजयासाठी आसुसलेल्या कोलकाताच्या नशिबी पुन्हा पराभव, गुजरातची टॉप-4 मध्ये दिमाखात एन्ट्री

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आयपीएल 2026 च्या 25 व्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सने आपला दबदबा कायम राखत कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 5 गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात शुभमन गिलची तुफानी फलंदाजी आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर गुजरातने गुणतालिकेत थेट टॉप-4 मध्ये एन्ट्री केली आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे केकेआरचा यंदाच्या हंगामातील संघर्ष अधिकच खडतर झाला आहे.

कॅमेरॉन ग्रीनचे वादळी अर्धशतक

कोलकाता नाईट रायडर्सने 3.6 षटकांत 32 धावांत तीन गडी गमावले होते. कर्णधार अजिंक्य रहाणे (0), अंगक्रिश रघुवंशी (8) आणि टिम सीफर्ड (19) बाद झाले. त्यानंतर कॅमेरॉन ग्रीनने धडाकेबाज अर्धशतक झळकावून डाव सावरला. ग्रीनने चार चौकार आणि तीन षटकारांसह 34 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 55 चेंडूंमध्ये 143च्या स्ट्राईक रेटने सात चौकार आणि सात षटकारांसह 79 धावांची स्फोटक खेळी केली आणि संघाला सन्मानजनक स्थितीत पोहोचवले.

कॅमेरॉन ग्रीन वगळता, संघातील इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. केकेआरसाठी, रोव्हमन पॉवेलने 20 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांसह 27 धावा केल्या. अनुकूल रॉयने नऊ, रिंकू सिंगने एक, आणि रमणदीप सिंगने 8 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एका षटकारासह 17 धावा केल्या. गुजरात टायटन्ससाठी कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. तर अशोक शर्माने आपल्या 2 बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णाने 1 बळी घेतला.

पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

या विजयासह गुजरात टायटन्सने 5 सामन्यांत तिसरा विजय नोंदवत 6 गुणांसह टॉप-4 मध्ये एन्ट्री घेतली. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 6 पैकी 5 सामन्यांत पराभव आणि एका सामन्यात पावसामुळे गुण विभागले गेल्याने केकेआर फक्त 1 गुणांसह गुणतालिकेत 10व्या स्थानावर घसरली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें