देशात लग्नसराईचा आणि अक्षय्य तृतीया सणाचा उत्साह सुरू झाला असतानाच जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. मध्यपूर्वेतील (Middle East) शांततेच्या बातम्यांनंतरही सोने चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. वाढत्या किमतींनंतरही बाजारपेठेत सोन्या-चांदीची (Gold Silver Price) मागणी कायम असून आज, १८ एप्रिल रोजी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.(Gold Silver Price)
Gold Silver Price: लग्नसराईमुळे मागणीत वाढ
सध्या लग्नसराईचा सीजन सुरू झाल्याने ज्वेलरी शोरूम्समध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. किमती वाढल्या असल्या तरी खरेदीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. तज्ज्ञांच्या मते, जर जागतिक बाजारपेठेत किमती खाली आल्या, तर स्थानिक बाजारपेठेतही दर कमी होऊ शकतात, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल.
Gold Silver Price: चांदीचा आजचा दर
आज दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे १० ग्रॅम चांदीचा भाव २,७५० रुपये आहे. तर १०० ग्रॅम चांदी खरेदीसाठी २७,५०० रुपये मोजावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये १० ग्रॅम चांदीचा दर २,७४९ रुपये इतका आहे.
Gold Silver Price: तुमच्या शहरातील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम):
दिल्ली :
२४ कॅरेट – १,५५,१२० रुपये
२२ कॅरेट – १,४२,२०० रुपये
१८ कॅरेट – १,१६,३८० रुपये
मुंबई :
२४ कॅरेट – १,५५,७८० रुपये
२२ कॅरेट – १,४२,८०० रुपये
१८ कॅरेट – १,१६,८४० रुपये
चेन्नई :
२४ कॅरेट – १,५५,०१० रुपये
२२ कॅरेट – १,४२,०९० रुपये
१८ कॅरेट – १,१८,५९० रुपये
कोलकाता :
२४ कॅरेट – १,५५,७८० रुपये
२२ कॅरेट – १,४२,८०० रुपये
१८ कॅरेट – १,१६,८४० रुपये
अहमदाबाद :
२४ कॅरेट – १,५५,८३० रुपये
२२ कॅरेट – १,४२,८५० रुपये
१८ कॅरेट – १,१६,८९० रुपये
लखनऊ :
२४ कॅरेट – १,५५,९३० रुपये
२२ कॅरेट – १,४२,९५० रुपये
१८ कॅरेट – १,१६,९९० रुपये
पटना :
२४ कॅरेट – १,५५,८३० रुपये
२२ कॅरेट – १,४२,८५० रुपये
१८ कॅरेट – १,१६,८९० रुपये
हैदराबाद :
२४ कॅरेट – १,५५,७८० रुपये
२२ कॅरेट – १,४२,८०० रुपये
१८ कॅरेट – १,१६,८४० रुपये
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताना ‘या’ ५ चुका टाळा
अक्षय्य तृतीया म्हणजे सुख-समृद्धी आणि अक्षय फळ देणारा दिवस मानला जातो. उद्या (रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी) हा सण साजरा होत आहे. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे सोने चांदी बाजारात मोठी गर्दी दिसून येते. मात्र, गर्दीच्या दिवशी, घाईघाईत किंवा भावनेच्या भरात सोने खरेदी करताना ग्राहकांकडून काही गंभीर चुका होतात. तुमचे कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जावेत यासाठी या ५ गोष्टी लक्षात ठेवा.
तुम्ही भविष्यात गरजेला उपयोगी म्हणून सोने घेत असाल, तर मोठे दागिने घेणे टाळा. त्यापेक्क्षा २४ कॅरेटची सोन्याची नाणी, वेढे किंवा ‘सोव्हरन गोल्ड बाँड्स’ घ्या, गुंतवणूक म्हणून हा उत्तम पर्याय आहे.
नेहमी ‘बीएआयस हॉलमार्क’ असलेलेच दागिने खरेदी करा. दागिन्यांवर ‘एचयूआयडी’ क्रमांक असल्याची खात्री करा. यामुळे तुमच्या सोन्याची पूर्ण माहिती सरकारकडे नोंद होते. त्याचबरोबर घेताना कॅरेट देखील चेक करा.
अनेक ज्वेलर्स ‘झीरो मेकिंग चार्जेस’च्या किंवा इतके-इतके टक्के मजुरीवर सुट अशा जाहिराती करतात. अशा वेळी सोन्याचा प्रति ग्रॅम दर तपासा किंवा ‘वेस्टेज चार्जेस’ (तूट) जास्त लावले जात नाहीत ना याची खात्री करा.
सोने परत विकताना वा बदलून घेताना किती पैसे कमी होतील, हे विचारून घ्या. नामांकित ज्वेलर्स त्यांच्याकडून घेतलेल्या सोन्यावर चांगला परतावा देतात.
अक्षय्य तृतीया आहे म्हणून जास्तीत जास्त सोने खरेदी करू नका. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या केवळ १० ते १५ टक्के रक्कम सोन्यात असावी.








