विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना अलीकडेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या आयुष्यातील या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दरम्यान, त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रणाबाली’ चा पोस्टर रिलीज झाला आहे. या आधी एक पोस्टर रिलीज झाल्या त्यामध्ये विजयचा एक तीव्र लूक दिसतो, जो एक शक्तिशाली पात्र असल्याचं दिसतं. आता चित्रपटाचा दुसरा पोस्टर समोर आला आहे त्यात पहिल्यांदाच रश्मिका विजय यांचा पुर्ण लूक दाखवला आहे. या धमाकेदार लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
विजय आणि रश्मिका तिसऱ्यांदा एकत्र दिसणार
‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ नंतर, विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दोघांना त्यांच्या मागील चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते आणि चाहते त्यांच्या पडद्यावर परतण्याची उत्सुकता बऱ्याच काळापासून बाळगून आहेत. त्यांचा तिसरा चित्रपट, ‘रणाबाली’, मध्ये विजय एका दमदार लूकमध्ये आहे, तर रश्मिका मंदान्ना ‘जयम्माची’ भूमिका साकारताना दिसणार आहे.
‘राणा बाली’ मधील किलर लूक
विजय देवेराकोंडाचा ‘रणाबाली’ हा चित्रपट काही सामान्य कथा नाही; तो 19 व्या शतकातील भारतात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाच्या दोन मिनिटांच्या टीझरमध्ये ब्रिटीश राजवटीची क्रूरता आणि त्यांच्या आर्थिक शोषणाचे चित्रण करण्यात आले आहे, ज्यामुळे देश उपासमार आणि दुष्काळाकडे ढकलला गेला. विजय देवेराकोंडाच्या ‘राणा बाली’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता अत्यंत शांत मात्र धाडसी भूमिकेत दिसतोय. या ऐतिहासिक चित्रपटात रश्मिकाची पोझही विशेष चर्चेत आहे. या लूकमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘राणा बाली’ हा चित्रपट यावर्षी 11 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या प्रसिद्ध दक्षिण भारतीय जोडप्याच्या या चित्रपटाबद्दल चाहते आधीच उत्सुक आहेत. चित्रपटाविषयीची चर्चा आणि क्रेझ पाहता दिग्दर्शक राहुल सांकृत्यायनला बॉक्स ऑफिसवर यश मिळण्याची खूप आशा आहे.








