Search
Close this search box.

पुणे पोलिसांची आंतरराष्ट्रीय कामगिरी! Dark Web वर कोड वापरून ड्रग्जची तस्करी करणारी टोळी गजाआड, 3.45 कोटींचा मुद्देमाल जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीचे एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणलं आहे. देशातील विविध शहरं ज्यामध्ये पुण्यासह, मुंबई, गोवा, गुवाहाटी येथून 5 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 3.45 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे पोलीस परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या खडकी पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.  कारवाईमध्ये अटक केलेल्या आरोपींच्या विविध बँकेतील खाती, क्रिप्टो व्होलेट व परदेशी चलनातून सुमारे 7 लाख 80 हजार रक्कम गोठवण्यात आली आहे.

पुण्यातील खडकी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक केली होती. तुषार चेतन वर्मा (वय 21) असं या तरुणाचे नाव होतं. त्याच्याकडे चौकशी केली असता या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली.

 

तुषार वर्मा याच्याकडे चौकशी केली करता तो सुमित डेडवाल आणि अक्षय महेर या दोघांकडून अंमली पदार्थ आणत असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी पिंपरी-चिंचवड मध्ये एक फ्लॅट भाड्याने घेवून तिथे चक्क हायड्रोपोनिक गांजाची शेती उभारली होती.

पोलिसांनी त्याठिकाणी ही शेती उध्वस्त करत अमली पदार्थ जप्त केले. तांत्रिक पद्धतीने पोलिसांनी तपास वाढवत मुंबई व गोवा येथे छापे टाकले. तपासादरम्यान, मलय राजेश देलीवाला या ड्रग्स पेडलर यालासुद्धा अटक केली.

अलख निरंजन! डार्क वेब वरून कोड नेम वापरून अमली पदार्थांची खरेदी विक्री 

यातील सर्व जण डार्क वेबचा वापर करत होते. डार्क वेबच्या सहाय्याने अंमली पदार्थांची खरेदी व विक्री करण्यासाठी यातील प्रमुख आरोपी वर्माने त्याचं नाव “अलख निरंजन” असं ठेवलं होतं. खरेदी विक्रीसाठी लागणाऱ्या पैशांच्या व्यवहारावर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून सगळी देवाणघेवाण करत होते. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोर फक्त भारतातील शहरापर्यंत मर्यादित नसून थेट थायलंड, भूतान सारख्या देशांपर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणी अजून 5 जणांचा शोध पोलिसांकडून सुरू असून त्यातील काही जण परदेशी नागरिक असल्याचं सांगितलं जात आहे.

डिलिव्हरी अॅपवरून अमली पदार्थांची तस्करी

यातील अनेक आरोपी हे अमली पदार्थांच्या खरेदी विक्रीसाठी चक्क ऑनलाईन डिलिव्हरी अॅप्लिकेशनचा वापर करत असल्याचं तपासातून समोर आलं आहे. ज्या पद्धतीने या ड्रग्सची मागणी येत असे त्याप्रमाणे काही ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून याची खरेदी व विक्री केली जात होती. अशा ऑनलाइन डिलिव्हरी अँप कंपनीच्या मालकांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

कोणाकडून किती ड्रग्सचा साठा जप्त?

1) तुषार चेतन वर्मा (21): 36 हजार 250 रुपयांचा 1 किलो 194 ग्रॅम गांजा, इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा, एक अॅपल कंपनीचा आयफोन 13. प्लास्टीक पिशव्या इत्यादी साहित्य

2) सुमित संतोष डेडवाल (25): यापूर्वी ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे

3) अक्षय सुखलाल महेर (25): 44 लाख 99 हजार रुपयांचा 408.78 ग्रॅम ओ.जी.कुश गांजा (हायड्रोफोनिक), 19 टी.एच.सी. पिल्स, ओ.जी. कश गांजा (हायड्रोफोनिक) प्लांट मधील साहित्य

4) मलय राजेश डेलीवाला (28): 2 लाख 81 हजार रुपयांचा 1325 ग्रॅम ओ.जी. कुश हायड्रोफोनिक गांजा, 132 ग्रॅम गांजा, 414ग्रॅम चरस, 496 ग्रॅम सायकलेडीक मशरुम, 40 ग्रॅम सी.बी.डी. ऑईल, 2 ग्रॅम एम.डी., 254 नग THC oil गमीज, 12 ग्रॅम एल.एस.डी. पेपर, 67 ग्रॅम एम.ए.एम.डी. पिल्स व इतर साहित्य

5) स्वराज अनंत भोसले (28): सध्या पोलीस कोठडीत असून तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें