Search
Close this search box.

प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू, सायकल चालवताना कारने हवेत उडवलं;

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गुरुग्रामच्या डीएलएफ फेज 2 परिसरात हिट अँड रनची घटना घडल्याचं समोर आलं आहे. सकाळी जवळपास 7.15 च्या सुमारास 58 वर्षीय उद्योजक अमिताभ जैन सायकल चालवत होते. यावेळी मागून वेगाने आलेल्या सँट्रो कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, अमिताभ जैन हवेत फेकले गेले आणि रस्त्यापासून दूर जाऊन पडले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतलं आहे.

मृत अमिताभ जैन औषधांच्या उद्योगातील प्रसिद्ध नाव होतं. त्यांना सायकल चालवण्याची खूप आवड होती. रोज सकाळी गुरुग्राममधील वेगवेगळ्या भागात ते सायकल चालवत असत. त्यांचा मुलगा लंडनमध्ये आयटी क्षेत्रात नोकरीला आहे, तर मुलगी बंगळुरुमधील एका मोठ्या एमएनसीमध्ये काम करते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबात शोकाकूळ वातावरण आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये अमिताभ जैन रस्त्याच्या कडेला सायकल चालवताना दिसत आहेत. यानंतर मागून येणारी कार त्यांना धडक देते. अपघातानंतही कारचालक तिथे न थांबता फरार होते. गुरुग्राम पोलिसांनी कारचा नंबर आणि त्याच्याशी संबंधित माहिती मिळवली आहे. पोलिसांनुसार, आरोपी कार चालकाचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

गुरुग्राम पोलिसांचे पीआरओ संदीप यांनी सांगितलं आहे की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबाने अद्याप तरी हत्येचा संशय व्यक्त केलेला नाही. तशी कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलीस सध्या तांत्रिक पुराव्यांची पडताळणी करत आहे. लवकरच आरोपीला अटक केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर गुरुग्राममधील वेगवान वाहनांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. स्थानिकांना या घटनेनंतर चिंता व्यक्त केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें