काही दिवसांपूर्वीच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) वनडे आणि टी 20 सीरिजसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली. यात टीम इंडियाच्या (Team India) वनडे कर्णधारपदावरून रोहित शर्माला शुभमन गिलने रिप्लेस केलं. 19 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे टेस्ट सीरिजला सुरुवात होणार असून यातून रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू अनेक महिन्यानंतर मैदानात पुनरागमन करणार आहेत. मात्र याआधी हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी पार्क मैदानात सराव करताना दिसला.
देशांतर्गत सामन्यासाठी सराव?
बीसीसीआयने खेळाडूंना सक्त ताकीद दिलीये की जेव्हा खेळाडू फ्री असतील तेव्हा त्यांनी देशांतर्गत सामन्यात खेळावे. टीम इंडियातुन पुढील सामने खेळायचे असतील तर प्रत्येक खेळाडूंना देशांतर्गत सामने सुद्धा खेळावे लागतील असे आदेश बीसीसीआयने दिल्याचे बोलले जाते. अशातच रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे आगामी विजय हजारे ट्रॉफी खेळण्याची शक्यता आहे.
15 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी रोहित शर्मा हा अभिषेक नायर, अंगकृष रघुवंशी आणि दोन तीन खेळाडूंसह दादर येथील शिवाजी पार्कमध्ये सराव करत होता. यावेळी नेट सरावादरम्यान त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली. सध्या त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची वनडे टीम:
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर केलेला भारतीय संघ –
शुभमन गिल (कर्णधार)
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रेयस अय्यर (उपकर्णधार)
अक्षर पटेल
केएल राहुल (विकेटकिपर)
नीतीश कुमार रेड्डी
वाशिंगटन सुंदर
कुलदीप यादव
हर्षित राणा
मोहम्मद सिराज
अर्शदीप सिंह
प्रसिद्ध कृष्णा
ध्रुव जुरेल (विकेटकिपर)
यशस्वी जायसवाल









