Search
Close this search box.

R Madhvan Legal Notice:आर. माधवनची वजन कमी करण्याचा दावा करणाऱ्या कंपनीला कायदेशीर नोटीस; पोस्ट करत सांगितलं कारण; म्हणाला…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अभिनेता आर माधवन (R Madhvan) धुरंधर चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत होता. धुरंधर 2 (Dhurandhar 2) चित्रपटाने बॉलीवूडमध्ये नवा इतिहास रचला. या चित्रपटाच्या प्रत्येक भूमिकेचा प्रचंड कौतुक झालं. एखादा हिट पिक्चर झाला की त्यातल्या कलाकारांना जाहिराती मिळतात हे प्रेक्षकांनी अनेक वेळा पाहिलं आहे. पण आर माधवनसोबत वेगळाच प्रकार घडलाय . आर माधवनची एक व्हिडिओ क्लिप वापरणाऱ्या एका वेलनेस कंपनीला टॅग करत आर माधवनने केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये आर माधवनने वजन कमी करणाऱ्या कंपनीला फटकारलं आहे. एवढेच नाही तर त्या कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. नेमकं प्रकरण काय ? पाहूया..

वेलनेस कंपनीवर आर माधवनचा संताप

सोशल मीडियावर सध्या आर माधवनची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने एका वेलनेस कंपनीच्या क्लिपचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे.स्क्रीन शॉटवर त्याने फ्रॉड असं लिहीत म्हटलं ‘ या रीलमुळे असं वाटतं की मी त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करतोय. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलाखतीतील एक क्लिप घेतली आणि मी त्यांच्या उत्पादनांना समर्थन देतोय अशा पद्धतीने दाखवली. लोकांनी अशा लोकांवर आणि त्यांच्या उपचारांवर विश्वास तरी कसा ठेवायचा? हे लाजिरवाणंय. कायदेशीर नोटीस पाठवल्याचंही आर माधवनने या स्क्रीनशॉटवर लिहिलं आहे.

तो पुढे म्हणाला ‘ किती लाजिरवाणी गोष्ट आहे. हे लोक आणि कंपनी असे करून सहज सुटू शकतील असा विचार तरी कसे करू शकतात ? तुम्ही कोणाच्या मुलाखतीचे क्लिप्स घेऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरू शकत नाही. कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. अशा लोकांपासून आणि संस्थांपासून सावध राहा ‘ असं कॅप्शन देणे या पोस्टला दिलं आहे.

चाहत्यांचा प्रतिक्रिया

आर माधवन च्या या पोस्टवर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांनी अभिनेत्याच्या भूमिकेचा समर्थन केलं. एका युजरने लिहिलं ‘ मेडी सर तुम्ही हे सगळ्यांसमोर आणलं हे खूप चांगलं केलं ‘ तर दुसऱ्याने लिहिलं ‘ मी कालच या कंपनीला ब्लड सॅम्पल दिलं, कारण तुम्ही त्यांच्या जाहिरातीत दिसत होतात ‘ असं त्याने म्हटलं.आर माधवन यांनी या पोस्टमध्ये त्या कंपनीला ही टॅग केलं आहे. तिचं instagram हॅण्डल @join. Elevate.now असं आहे. या कंपनीचे instagram वर हजारो फॉलोवर्स आहेत.विशेष म्हणजे या कंपनीने वापरलेली आर माधवन यांची क्लिप ही 2024 मधील एका मुलाखतीतील होती.त्या मुलाखतीत त्यांनी अवघ्या 21 दिवसात वजन कमी केल्याचा अनुभव शेअर केला होता.

admin
Author: admin

और पढ़ें