Search
Close this search box.

‘लालबागचा राजाला आता गरबा बघायला मिळेल,’ मनसेची जहरी टीका, ‘जिओचं ब्रँडिंग भीतीदायक, उद्या अदानी…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिओने ज्याप्रकारे लालबागचा राजा गणेश मंडळाचं ब्रँडिंग केलं ते ते फार भीतीदायक, क्लेषदायक आणि मनाला दु:ख देणारं आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. पुढच्या वेळेपासून गणपतीत गरबा खेळतील इतकी परिस्थिती यायला नको अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली आहे. उद्या जर अदानींना वाटलं तर बाजूचं गणपती मंडळ घेतील आणि तिथे फक्त अदानींचं ब्रँडिंग करतील असंही ते म्हणाले आहेत.

“मला भीती एका गोष्टीची वाटते ती म्हणजे ज्याप्रकारे जिओने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळासाठी ब्रँडिंग केलं तो थोडं भीतीदायक आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. त्यांनी एका उद्देशाने गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. त्यामध्ये सामाजिक जाणीव, भावना निर्माण व्हावी, सामाजिक सुधारणा व्हावी, समाजउपयोगी कार्यक्रम व्हावेत असा उद्देश होता, यातील काहीच होताना दिसत नाही,” अशी खंत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

“गणपती मंडळ उद्योग समूहांसाठी ब्रँडिग करण्याचं ठिकाण झालं आहे का हा प्रश्न या सगळ्यातून उद्भवतो. जिओने लालबागचा राजा मंडळाचं ब्रँडिंग केलं होतं. उद्या जर अदानींना वाटलं तर बाजूचं गणपती मंडळ घेतील आणि तिथे फक्त अदानींचं ब्रँडिंग करतील. मग जी गणेशोस्तव मंडळं ज्या भावनेने स्थापन झाली तीच यातून निघून जाते. ज्या पद्धतीने या उद्योग समूहांचं अधिपत्य या मंडळांवर जाणवत आहे जे मला यावेळी खूप जाणवलं, ते फार भीतीदायक, क्लेषदायक आणि मनला दु:ख देणारं आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढच्या वेळेपासून गणपतीत गरबा खेळतील इतकी परिस्थिती यायला नको अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. “उद्योगपतींचं अधिपत्य गणेशोत्सव मंडळांवर पैशांच्या, ब्रँडिंगच्या माध्यमातून जाणवत आहे ते मराठी माणसांसाठी, मराठी मंडळांसाठी धोक्याची घंटा आहे”, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “लालबागचा राजाला पैशांची कमी कधीच नव्हती आणि यापुढेही राहील असं वाटत नाही. जोपर्यंच लालबागचा राजाची कृपा आहे तोपर्यंत मंडळाला अशी चिंता करण्याची गरज असल्याचं वाटत नाही”.

admin
Author: admin

और पढ़ें