टिटवाळ्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. 21 वर्षीय तरुणीवर जन्मदात्या बापानेच वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरुणी 16 वर्षांची असल्यापासून सख्खा बापच तिच्यावर अत्याचार करत होता. पोलिसांनी या नराधम बापाला अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाप, आरोपी रेल्वेत उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे समोर आले आहे. कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर एका समाजसेविकाच्या मदतीने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नराधम बाप हा तब्बल सहा वर्षांपासून पोटच्या मुलीवर अमानुष अत्याचार करत होता. तसंच, या प्रकाराची बाहेर कुठे वाच्यता केलीस तर आईला आणि तुला दोघांनाही ठार करेन, अशी धमकी आरोपी सातत्याने तिला देत होता. मुलगी 16 वर्षांची असल्यापासून तिच्यावर अत्याचार होत होता.
मुलगी अवघी 16 वर्षांची असताना छळाला सुरुवात झाली. अखेर एक दिवस या छळाला कंटाळून मुलीने एका समाजसेविकेला सर्व प्रकार सांगितला. तिच्या मदतीने हा सर्व प्रकार उघड झाला. आरोपी हा रेल्वेतील उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे समजते. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी होत आहे. बापाच्या रूपातच जेव्हा नराधम घरात असतो, तेव्हा अशा मुलींची सुटका कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितले की, मुलीच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून कल्याण न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातही बापाचा मुलीवर बलात्कार
पुण्यातील नांदेड सिटी परिसरात ही घटना घडली आहे. स्वतःच्या 14 वर्षे मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता, आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा झाला आहे. बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणलाय त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
