Search
Close this search box.

महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत; नविन विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारी सुपर कनेक्टीव्हिटी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोस्टल रोड हा महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प आहे. मुंबई शहरात मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. मुंबई प्रमाणेच आता महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत बनवला जात आहे. या कोस्टल रोडला सुप कनेक्टिव्हिटी असमार आहे. हा कोस्टल रोड मुंबई येथील नविन विमानतळ आणि अटल सेतुला जोडणार आहे.

हे देखील वाचा… महाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहर
नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतीथावर आहे. नवी मुंबई विमानतळ प्रत्यक्षात कार्यन्वित झाल्यानंतर येथे पोहचण्यासी अनेक रस्ते निर्माण केले जात आहेत. नवी मुंबई कोस्टल रोड देखील नवी मुंबई विमानतळाच्या केनेक्टिव्हीसाठी बांधला जात आहे. नवी मुंबई कोस्टल रोड हा थेट नवी मुंबई विमानतळाला जोडला जाणार आहे. यासह हा कोस्टल रोड अटल सेतुला देखील कनेक्ट केला जाणार आहे. या कोस्टल रोडमुळे सायन पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण देखील कमी होणार आहे.

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत कोस्टल रोड उभारला जात आहे. प्रामुख्याने सायन-पनवेल मार्गाला नेरुळ ते खारघरदरम्यान एक दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यासाठी हा कोस्टल रोड उभारला जात आहे. या कोस्टल रोडमुळे पामबीच मार्गाबरोबर सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे. भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे आणि अटल सेतूकडे जाण्यासाठीच्या नवीन मार्गाचा पर्याय कोस्टल रोडच्या माध्यामातून उपलब्ध होणार आहे. यामुळे नवी मुंबईतील वाहतूक सुकर होणार आहे.सिडकोच्या माध्यनातून नेरुळ जेट्टी ते खारघर असा किनारी मार्ग अर्थात कोस्टल रोड उभारला जात आहे. खारघर कोस्टल रोडला सीआरझेडची परवानगी मिळाली आहे.

हा प्रस्तावित खारघर कोस्टल रोड खारघर सेक्टर 16 येथून सुरू होणार आहे. या कोस्टल रोडची लांबी 9.6 किमी आहे. हा कोस्टल रोड सायन-पनवेल महामार्गाला ओलांडून बेलापूर जेट्टीला जोडला जाणार आहे. तिथून पुढे पाम बीच मार्ग पार करून, नेरुळ जेट्टीपर्यत जाणार आहे. खारघर-बेलापूर-नेरुळ असा हा कोस्टल रोड सायन-पनवेल रोडसाठी नवीन दुवा ठरणार आहे. तसेच खारघर स्थानकाच्या मागे पंतप्रधान आवास योजेनेमध्ये याचा मुख्य प्रवेश असेल. तळोजा येथील कॉर्पोरेट पार्क, पंतप्रधान आवास गृहनिर्माण येथे पर्यायी प्रवेश करता येणार आहे. नवीन नियोजित कनेक्टिव्हिटीद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतूशी कनेक्टिव्हिटी असणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें