Search
Close this search box.

…अन् मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ शापित दरवाजा उघडला; कित्येक वर्षांपासून ‘वास्तूदोषा’मुळे होता बंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांनी शनिवारी विधानसभेचा दक्षिणाभिमुख दरवाजा उघडला. हा दरवाजा गेल्या कित्येत वर्षांपासून बंद होता. वास्तूदोषामुळे हा दरवाजा काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी तात्काळ हा दरवाजा उघडण्यास सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी त्याच दरवाजातून प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री सिद्धरमय्या विधानसभेतील आपल्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांश अन्न भाग्या योजनेवर चर्चा करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी पाहिलं तर विधानसभेचा दक्षिणाभिमुख दरवाजा बंद होता. त्यांनी चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दक्षिणाभिमुख दरवाजा अशुभ मानला जात असल्याने तो उघडला जात नाही. यानंतर सिद्धरमय्या काही वेळासाठी दरवाजाच्या समोर उभे राहिले आणि नंतर अधिकाऱ्यांन दरवाजा उघडण्याचा आदेश दिला. आपल्या कार्यालयात प्रवेश केल्यानंतर सिद्धरमय्या यांनी ‘वास्तू’ची आपली व्याख्या सांगितली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, जिथे तुमच्या निरोगी मेंदू, स्वच्छ ह्रदय यांना स्थान मिळतं तीच चांगली वास्तू आहे. यामध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि ताजी हवा आली पाहिजे. दरम्यान एका अधिकाऱ्याने सांगितलं की, याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्याने हा दक्षिणाभिमुख दरवाजा उघडण्याची हिंमत केली नाही.

मुख्यमंत्र्यांनी दरवाजाने केला प्रवेश
ट्विटरला शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत मुख्यमंत्री आपल्या कर्मचाऱ्यांना हा दक्षिणाभिमुख दरवाजा बंद का आहे? असं विचारत असल्याचं दिसत आहे. त्यावर कर्मचारी वास्तूदोषामुळे बंद आहे असं सांगतात. यानंतर ते याच दरवाजाने आत प्रवेश करतात.
दरम्यान या व्हिडीओवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्र्यांना अंधविश्वास दूर केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

शनिवारी झालं होतं या दरवाजाचं उद्घाटन
अधिकाऱ्याने सांगितलं की, माझ्या माहितीनुसार कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी हा दरवाजा कधी उघडला नाही. ते आपल्या राजकीय करिअरसाठी या दरवाजाला अशुभ मानत होते. असंही सांगितलं जातं की, या दक्षिणाभिमुख दरवाजाचं उद्घाटन शनिवारी झालं होतं. अशात हे आयुष्यात दु:ख येण्याचं कारण ठरु शकतं अशी शंका निर्माण होत होती.

तत्कालीन मुख्यमंत्री जे एच पटेल यांना निवडणुकीत अपयश आल्यानंतर 1999 मध्ये या दरवाजाला टाळं ठोकण्यात आलं होतं. 2013 मध्ये सिद्धरमय्या यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा दरवाजा उघडला होता. पण 2018 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तो पुन्हा बंद झाला होता.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.