Search
Close this search box.

TCS job scam : नोकरीच्या बदल्यात पैसे, 100 कोटींची लाचखोरी, टीसीएसने 4 अधिकाऱ्यांना केलं बडतर्फ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

टीसीएस (Tata Consultancy Services Ltd) ही भारतातील बड्या आयटी कंपनीपैकी एक मानली जाते. मात्र, टीसीएसमध्ये (TCS)नोकरीच्या बदल्यात लाचखोरी झाल्याचं उघड झालं आहे. जवळपास 100 कोटी रुपयांची लाच घेतली असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी टीसीएस कंपनीनं चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केलंय. त्यासोबतच तीन स्टाफिंग फर्मवर बंदी देखील घातली आहे. टीसीएसनं यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेय.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services Ltd (TCS)) या बड्या आयटी कंपनीत लाच देऊन नोकर भरतीचा घोटाळा उघडकीस आला आहे. एका अहवालानुसार, कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या उमेदवारांना नोकऱ्या देण्याच्या बदल्यात स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत होते. अनेक वर्षांपासून कंपनीत हे प्रकार सुरु होते. आता घोटाळा उघडकीस आल्यानंतर टाटा समूहाची कंपनी टीसीएसने तातडीने कारवाई केली. कंपनीने आपल्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप (आरएमजी)मधून चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आणि ३ स्टाफिंग फर्मवर बंदी घातली.

एका व्हिसलब्लोअरने कंपनीच्या सीईओ आणि सीओओला पत्र लिहून आरएमजीचे ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती उमेदवारांना नियुक्ती देताना स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत आहेत, असा दावा केला. या आरोपांच्या चौकशीसाठी कंपनीकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली गेली. आणि चौकशीनंतर टीसीएसने आपल्या भरती प्रमुखांना रजेवर पाठवले आणि चार आरएमजी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. गेल्या 3 वर्षांत टीसीएसनं कंत्राटी भरतीसह 3 लाख लोकांना कामावर घेतले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांनी कमिशनच्या माध्यमातून किमान 100 कोटी रुपये कमावले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, ह्या प्रकरणी टीसीएसकडून घोटाळा झालाच नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.

टीसीएसकडून सांगण्यात आलंय की कोणताही घोटाळा झाला नसून काही कर्मचारी आणि स्टाफिंग फर्मकडून नियमांचा भंग झालाय. कंपनीतील भरती प्रक्रिया रिसोर्स मॅनेजमेंट ग्रूपकडून हाताळली जात नाही. सोबतच कंपनीतील कोणताही प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती यात सहभागी असल्याचं आढळलं नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, असं असलं तरी दुसरीकडे विविध प्रकल्पांसाठी माणसं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आरएमजीवर असल्याचं टीसीएसकडून मान्य करण्यात आलंय. दुसरीकडे, टीसीएस या घोटाळ्यात आर्थिक धक्का जरी लागला नसला तरी मेहनतीने उभ्या केलेल्या इमेजला मात्र धक्का लागला आहे हे मात्र नक्की.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.