Search
Close this search box.

Ratnagiri Accident : दापोलीत भीषण अपघात, वडाप गाडी-ट्रेलरची जोरदार धडक, आठ जणांचा मृत्यू, सात जखमी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली (Dapoli) तालुक्यातील हर्णे मार्गावर रविवारी (25 जून) संध्याकाळी मॅक्झिमो (वडाप गाडी) आणि ट्रेलर यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात बाप-लेकीसह आठ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये मॅक्झिमोचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे दापोली आणि हर्णे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने जंगलामध्ये पळ काढला.

कसा झाला अपघात?
दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर आसूद जोशी बागेजवळ काल संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. बांधकाम साहित्य रिकामं करुन आलेला रिकामा ट्रेलर दापोलीकडे येत होता. यावेळी समोरुन मॅक्झिमो घेऊन हर्णेच्या दिशेने जात होते. यावेळी वडाप गाडीत 14 प्रवासी होते. दोन्ही गाड्या जोशी बागेजवळ अवघड वळणावर आल्या. यावेळी ट्रेलरने बाहेरुन वळण घेतले. यामुळे मॅक्झिमोला पुढे जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही.याचवेळी ट्रेलरने या गाडीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.

अपघातात वडाप गाडीच्या चालकाचा मृत्यू, ट्रेलर चालकाचं पलायन
अपघातात मृत्यू झालेले सर्व दापोली तालुक्यातील होते. अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना उपचारांसाठी सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे प्राथमिक उपचार करुन काही जणांना पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठवण्याची माहिती आहे. या अपघातात मॅक्झिमो गाडीचा चालक अनिल सारंग यांचा मृत्यू झाला. ते हर्णे इथले रहिवासी होते. तर ट्रेलर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केलं.

रत्नागिरीत (Ratnagiri) अपघातांचं प्रमाण वाढलं
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात अलिकडे रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. तीन दिवसांपूर्वी दापोलीतून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका आराम बसला नायगाव-घोडबंदर रोडवर अपघात झाला होता. या अपघतात बसमधील एकजण गंभीर जखमी झाला होता. प्रशांत भुवड असं जखमी प्रवाशाचं नाव आहे. तो दापोलीमधील रहिवासी आहे. कंटेनरला ओव्हरटेक करताना हा अपघाता झाला. तर 16 जून रोजी दापोली तालुक्यात उन्हवरे मार्गावर एसटी बस आणि प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच प्राण सोडले. सुरेश पाटील असं मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.