Search
Close this search box.

समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण, पुढील महिन्यात वाहतुकीसाठी होणार खुला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा सुरु होणार आहे. शिर्डी ते नागपूर हा समृद्धी महामार्गाचा एक मार्ग सुरु झाल्यानंतर दुसरा एक मार्ग सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिर्डी ते भरवीर 80 किमीच्या समृद्धीमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा मार्ग मे महिन्यात सुरु होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटरचा मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मे महिन्यात शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा समृद्धी मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटरचा समृद्धीवरील मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन एम एसआरडीसी करीत आहे. तसे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली.

admin
Author: admin

और पढ़ें