Search
Close this search box.

मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्ह्याच्या उरण मतदारसंघातील भाजपा (BJP) आमदार महेश बालदी यांना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. आमदार महेश बालदी यांच्यासह एकूण 4 जणांना अलिबाग (Raigad) येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, शिक्षा झालेल्या सर्व चारही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आल्याने आरोपींना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. तसेच, सत्र न्यायालयाच्या या निकालावर जिल्हा न्यायालयात (Court) अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदतही देण्यात आली आहे. दरम्यान, 2010 मधील हे प्रकरण आहे.

रायगड जिल्ह्याीतल उरणमध्ये एका मुलीची छेडछाड काढण्यात आल्याचं हे 2010 मधील प्रकरण आहे. मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी आमदार महेश बालदी व इतर लोक गेले होते. त्यावेळी, संबंधित युवकाला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली, त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा खटला अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू होता. तब्बल 16 वर्षानंतर या खटल्यात न्यायालयाने निकाल दिला असून आमदार महेश बालादी यांच्यासह चारही जणांना दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें