Search
Close this search box.

Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत घडलेल्या बहुचर्चित महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या सुनावणी (Conversion Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. एमआयएम (AIMIM) नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना आज (19 नोव्हेंबर 2026) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. नाशिकमधील बहुचर्चित धर्मांतर आणि महिला छळ प्रकरणात (TCS प्रकरण) आरोपी निदा खानला (Nashik TCS Case News) आश्रय दिल्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी इम्तियाज जलील ( Imtiaz jaleel) यांचाही आरोपींमध्ये समावेश असल्याचे सांगत  गुन्हा दाखल केला होता. तर पुरवणी आरोपपत्रात इम्तियाज जलील यांना सहआरोपी केल्यानंतर ते सुनावणीसाठी आज न्यायालयात हजर झाले होते. जवळ जवळ अडीच तास चाललेल्या सुनावणीच्या कामकाजानंतर अखेर न्यायालयाने इम्तियाज जलील यांना जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. (Imtiaz Jaleel Nashik TCS Case News)

दरम्यान, नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या माध्यमातून तपासाची माहिती आणि तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, तसेच इम्तियाज जलील यांना जामीन का देण्यात यावा, या संदर्भातही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच एकंदरीत या प्रकरणात त्यांचा काय संबंध होता हे जाणून घेतलं. परिणामी या प्रकरणावर दाखल जामीन अर्जावर न्यायालयाने निर्णय देत त्यांनापन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

 

Nashik TCS Case News : आरोपी निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

TCS कंपनीत घडलेल्या बहुचर्चित प्रकरणाच्या गुन्ह्यातील आरोपी (Nashik Crime News)निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अशातच इम्तियाज जलील ( Imtiaz jaleel) यांच्यां विरोधात पुरावे असल्याने त्यांना देखील आरोपी करण्यात आलं होतं. नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या SIT च्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणात इम्तियाज जलील यांचे नाव आल्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अखेर न्यायालयाने इम्तियाज जलील यांना जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

नाशिक मध्ये MIM कडून बॅनरबाजी; ‘शेर ए महाराष्ट्र’ असा उल्लेख

एमआयएम (AIMIM) नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील आज नाशिक न्यायालयात हजर होणार होते. त्या पार्श्वभूमीवर जलील यांच्या समर्थनार्थ नाशिक मध्ये MIM कडून बॅनरबाजी करण्यात आल्यासह बघायला मिळाले. शिवाय या बॅनरवर ‘शेर ए महाराष्ट्र’ असा उल्लेख देखील करण्यात आला होता. टीसीएस धर्मातर आणि लैगिक शोषण प्रकरणात संशयित आरोपी निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी इम्तियाज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकाणाच्या सुनावणीच्या अनुषंगाने इम्तियाज जलील आज नाशिक जिल्हा न्यायालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी खास होर्डिंग लागल्याचे बघायला मिळाले.

 

admin
Author: admin

और पढ़ें