दहिसरमध्ये तंत्र-मंत्राच्या नावाखाली ज्येष्ठ दाम्पंत्याची 6.38 कोटींची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. तंत्र-मंत्र, जादूटोणा आणि अघोरी पूजेच्या नावाखाली सेवानिवृत्त ज्येष्ठ दाम्पत्याची तब्बल 6.38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दहिसर परिसरातील हा धक्कादायक प्रकार असून तब्बल 10 वर्षे दाम्पत्याला अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते. डायन, श्राप आणि वाईट शक्तींची भीती दाखवून आरोपींकडून आर्थिक लूट करण्यात आली. दहिसर पोलिसांकडून 13 नोव्हेंबर 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परसिस दारा मेहता यांच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी उमेश देशपांडे याच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2016 मध्ये फसवणुकीला सुरुवात झाली होती. दहिसर पूर्वेतील गायत्री सोसायटीमध्ये राहणाऱ्या परसिस मेहता यांची शेजारी मेघना इनामदार हिच्यामार्फत पनवेलमधील रमाबाई साने आणि उमेश देशपांडे यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी पती दारा मेहता यांना तीन वेळा पक्षाघाताचा (Mumbai Crime News) झटका आला होता. घरात वास्तुदोष आणि जादूटोणा असल्याचे सांगून पूजा करण्याच्या नावाखाली 40 ग्रॅम सोन्याची साखळी आणि 3.85 लाख रुपये घेतले. आरोपींनी फसवणुकीसाठी अनेक काल्पनिक व्यक्ती आणि बनावट ओळखी तयार केल्या होत्या. मुख्य आरोपी उमेश देशपांडे आवाज बदलून स्वतःला हैदराबादमधील मठाचा 108 वर्षांचा गुरुवर्य असल्याचे भासवत होता तर अश्विनी गायकवाड ही स्नेहलता दीक्षित उर्फ बाईसाहेब, तर वृषाली गायकवाड ही रमाबाई साने असल्याचे भासवत होती.
रमाबाईची हत्या झाली आणि बाईसाहेब यांनी कामशेत येथे समाधी घेतली असल्याच्या खोट्या कहाण्या दाम्पत्याला सांगितल्या. आरोपींकडून घरात अघोरी पूजा, काळी बाहुली ठेवणे असे प्रकार करण्यात आले. नेपाळमधील साधूची भस्म आणि सिंदूर दाम्पत्याला खाण्यास दिल्याचा आरोप आहे. घरातील संपत्तीवर डायन आणि वाईट शक्तींचा प्रभाव असल्याचे सांगून भीती दाखवली. पती आणि दोन्ही मुलांचा जीव धोक्यात असल्याचे सांगून आरोपींनी दाम्पत्याला मानसिक दबावाखाली ठेवले. संपत्ती शुद्ध करण्याच्या नावाखाली दहिसर आणि बोरिवली येथील 4 फ्लॅट विकण्यास भाग पाडले. फ्लॅट विक्रीतून मिळालेले सुमारे 3.02 कोटी रुपये आरोपींनी हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय सुमारे 1.60 कोटी रुपयांचे शेअर्स विकण्यास भाग पाडले. बँक आणि पोस्ट ऑफिसमधील 45 लाख रुपयेही काढून घेतले. घरातील फर्निचरदेखील आरोपींनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Crime News)
मठ बांधण्याच्या नावाखाली सावकाराकडून दरमहा 8 टक्के व्याजाने 45 लाख रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडले. या कर्जाची परतफेड करण्यासाठी दाम्पत्याचे सुमारे 90 लाख रुपये खर्च झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जून 2025 मध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या दाम्पत्याने हैदराबादला जाण्यासाठी शेजारी रवींद्र किणी यांच्याकडे 24 हजार रुपये उसने मागितले होते. दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती पाहून शेजाऱ्याला संशय आला आणि त्याने चौकशी सुरू केली. आरोपींनी फसवणुकीतून मिळालेल्या पैशांतून गोरेगावच्या नागरी निवारा परिषद परिसरात अनेक फ्लॅट खरेदी केल्याचा संशय आहे. मुख्य आरोपी उमेश देशपांडे याला दिंडोशी पोलिसांनी यापूर्वीच अन्य एका प्रकरणात अटक केली आहे. दहिसर पोलीस इतर आरोपींची भूमिका आणि फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेल्या मालमत्तांचा तपास करत आहेत. (Mumbai Crime News)
मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2016 मध्ये या फसवणुकीला सुरूवात झाली. दहिसर पूर्वेकडील गायत्री सोसायटीत राहणाऱ्या परसिस मेहता यांची भेट शेजारील मेघना इनामदार हिच्यामार्फत पनवेल येथील रमाबाई साने आणि तिचा साथीदार उमेश देशपांडे यांच्याशी झाली होती. त्या काळात परसिस यांच्या पतीला, दारा मेहता यांना तीन वेळा पक्षाघाताचा (लकवा) अटॅक आला होता. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्या घरात वास्तुदोष आणि जादूटोणा असल्याचे भासवून पूजाअर्चा करण्यासाठी प्रथम 40 ग्रॅम सोन्याची चेन आणि 3.85 लाख रुपये उकळले.
काल्पनिक पात्रे आणि खोट्या कहाण्यांचा बनाव
तपासात असे समोर आले आहे की, या टोळीने फसवणूक करण्यासाठी अनेक काल्पनिक पात्रे निर्माण केली होती. मुख्य आरोपी उमेश देशपांडे आपला आवाज बदलून स्वतःला हैदराबादच्या मठातील 108 वर्षीय ‘गुरुवर्य’ म्हणून भासवायचा. तर अश्विनी गायकवाड, स्नेहलता दीक्षित उर्फ ‘बाईसाहेब’ आणि वृषाली गायकवाड या रमाबाई साने बनून त्या दाम्पत्याशी बोलायच्या. आरोपींनी पुढे जाऊन रमाबाईची हत्या आणि बाईसाहेबने कामशेतमध्ये समाधी घेतल्याच्या खोट्या कहान्याही तयार करून सांगितल्या. त्यानंतर त्या दाम्पत्याला ‘गुरुवर्य’ सांगेल त्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यास भाग पाडले गेले.
फ्लॅट, सोने आणि शेअर्स बळकावले
आरोपींनी घरात अघोरी पूजा करण्यास सांगून काळी बाहुबली ठेवली आणि दाम्पत्याला नेपाळच्या साधूचे भस्म व सिंदूर खाण्यास दिले. त्यांच्या संपत्तीवर डायन आणि दुष्ट शक्तींचा प्रभाव असून, जर असे केले नाही तर पती आणि दोन्ही मुलांचा मृत्यू होईल, अशी भीती त्यांना घालण्यात आली. संपत्ती शुद्ध करण्याच्या नावाखाली आरोपींनी दहिसर आणि बोरीवली येथील त्यांचे चार फ्लॅट विकण्यास लावले. या फ्लॅट्सच्या विक्रीतून मिळालेले सुमारे 3.02 कोटी रुपये आरोपींनी लाटले.
याशिवाय, सुमारे 1.60 कोटी रुपयांचे शेअर्स विकायला लावले आणि बँक व पोस्ट ऑफिसमधील 45 लाख रुपयांची रोकडही काढून घेतली. एवढेच नव्हे तर घरातील फर्निचरसुद्धा त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. मठाच्या बांधकामासाठी एका साहूकाराकडून (सुदखोर) 8 टक्के मासिक व्याजाने 45 लाख रुपयांचे कर्ज काढण्यासही या दाम्पत्याला भाग पाडले गेले. या कर्जाची परतफेड करताना त्या दाम्पत्याचे तब्बल 90 लाख रुपये खर्च झाले.








