Search
Close this search box.

PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले ‘देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवारांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. रुग्णालयातून शरद पवार थेट मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार देखील आहेत. डॉक्टरांनी पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला असून पवार यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा दुष्काळी पाहणीचा दौरा रद्द करण्यात आला होता. तसेच त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. शरद पवार यांना कफ झाला होता. तसेच त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. विविध चाचण्याही करण्यात आल्या होत्या. त्यांची प्रकृती आता स्थिर झाल्याने त्यांना दोन दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शरद पवारांना नरेंद्र मोदींचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे, मोदींनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच काळजी घेण्याचं आवाहन केले असल्याची माहिती पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार (Vitthal Maniyar) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.(Vitthal Maniyar)

एबीपी माझाशी बोलताना विठ्ठल मणियार यांनी सांगितलं की, डॉक्टरांनी शरद पवारांना सांगितलं आहे की, दौरे कमी केले पाहिजेत. प्रवास कमी केला पाहिजे, त्याच्यात थोड्या मर्यादा आणल्या पाहिजेत. प्रवासही कमी केले पाहिजे, दुसरं त्यांनी डाएट व्यवस्थित घेतला पाहिजे,  ते खाण्याच्या बाबतीत फार दक्षता घेत नाहीत, त्यांना सांगावं लागतं हे खा, ते खा, ऑपरेशन झाल्यानंतर साहेबांना लिक्वीड डाएट घ्यावं लागतं, लिक्वीड डाएट घेऊन माणूस कंटाळतो, सारखं तेच तेच. आता थोडा थोडा बदल होतो आहे, दुधासोबत भाकरी वगैरे खात आहेत, त्यामुळे आता हळूहळू त्यांचा अशक्तपणा कमी होईल, त्यांनी दोन चार दिवस आराम केला पाहिजे, असंही विठ्ठल मणियार यांनी म्हटलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें