मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या बऱ्याच घटना उघडकीस येत आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं प्रकरण उघडकीस आलं होतं, ते म्हणजे अशोक खरात… इथे भोंदूबाबा अशोक खरातने धार्मिक विधीच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं. त्याने केलेल्या या संपूर्ण कांडांचे काही व्हिडीओ देखील समोर आले होते. यात काही राजकीय नेते देखील अडकल्याची तेव्हा चर्चा झाली. हे प्रकरण मिटत नाही, तोपर्यंत नाशिकमधून भोंदूगिरीची अजून एक घटना समोर आली आहे.
पीडितेचा विनयभंग केला
आता नाशिक जिल्ह्याच्या येवला परिसरातून असाच धक्कादायक तथा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. इथे एका भोंदूबाबाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित महिला आरोपीच्या आश्रमात धार्मिक विधी करण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीनं तिचा गैरफायदा घेतला. सुरुवातीला त्याने पीडितेचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत भोंदूबाबाला अटक केली आहे.