Search
Close this search box.

पुण्यात पाच लाख 64 हजारांच्या बनावट नोटा जप्त, रॅकेटचं मुंबई, कोल्हापूर कनेक्शन समोर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

  मागील काही दिवसात पोलिसांकडून देशातील विविध भागात बनावट नोटांचं रॅकेट समोर आलं आहे. आता पुणे शहरातून सुद्धा अशीच एक घटना समोर आली असून एका आंतरजिल्हा टोळीतील व्यक्तींकडून पुणे शहरात बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्न केला जात होता. पुणे शहरात बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरजिल्हा टोळीतील चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पाचशे रुपये दराच्या पाच लाख 64 हजार रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटर आणि संगणकीय साहित्य जप्त केले आहे. या रॅकेटचे सातारा, कोल्हापूर व मुंबई कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे.

चौघांच्या टोळीला अटक : 

बनावट नोटा आंतरजिल्हा टोळीतील चौघे आरोपींमध्ये विशाल विलास गलांडे, सलमान जैनुद्दीन राजे, शाफाज फिरोज अन्सारी आणि अभिजित रावसाहेब कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई परिसरात एकजण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली. पोलिसांनी मंडईच्या मागील बाजूस म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर सापळा रचला.

सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या तब्बल 805 बनावट नोटा आढळून आल्या. सलमानकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्यातील इतर तीन साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने पथके रवाना केले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने विशाल गलांडे आणि अभिजित कांबळे यांना शिरोळ येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कलर प्रिंटर, मॉनिटर, सीपीयू, की बोर्ड, माऊस असा 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी शाफाज अन्सारी याच्या घरातून पाचशे रुपयांच्या आणखी 323 बनावट नोटा हस्तगत केल्या.

admin
Author: admin

और पढ़ें