Search
Close this search box.

मोठी दुर्घटना! दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान चेंगराचेंरी, 17 जणांचा मृत्यू, 40 जखमी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात धक्कादायक घटना घडली आहे. दूर्गापूजेचा उत्सव साजरा करण्यासाठी जमा झालेल्या लोकांवर काळाने घाला घातला आहे. दूर्गापूजेच्या उत्सवात शेकडो लोक सहभागी झाले होते. अचानक चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे 17 जणांचा मृत्यू झालाय. तब्बल 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे.

उत्तर कोलकात्यातील चोरबागान येथे ही घटना घडली आहे.  सार्वजनिक पूजा मंडपात प्रडंच गर्दी झाली होती. गर्दीमुळे मंडपाचा काही भाग कोसळला, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. चेंगराचेंगरीमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला असून, अंदाजे 40 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर, सर्व बाधित लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढून कलकत्ता मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. पूजा आयोजकांनीही मदत आणि बचाव कार्यात सहभाग घेतला. मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी आणि मुख्य सचिव मनोज अग्रवाल हेदेखील कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले.

चोरबागान येथील शारदा पार्क पूजा मंडपाच्या बाहेरच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाली.  कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे मंडपात प्रचंड गर्दी झाली. सायंकाळी 7:40 च्या सुमारास गिरीश पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेनंतर जखमींना तताडीने मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (MCH) मध्ये दाखल करण्यात आले. पोलीस, अग्निशमन दल, नियंत्रण कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन गट (DMG) यांची पथके घटनास्थळी रवाना झाली.

प्रत्यक्षदर्शीनी घटना स्थळी नेमकं काय घडलं याबाबत सांगितले, अनेक लोक बेशुद्ध पडले होते. काहींना मोटरसायकलवरून नेले जात होते. प्रत्यक्षदर्शीनुसार, त्याने जवळच अनेक लोकांना बेशुद्ध पडताना आणि मोटरसायकलवरून नेले जात असताना पाहिले. त्याने असेही सांगितले की, घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
रुग्णवाहिकेसह एक वैद्यकीय पथकही घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाच्या निर्देशानुसार ताला प्रतॉय मंडपही तात्पुरता बंद करण्यात आला आहे. चेतला अग्रानी मंडप एका तासासाठी बंद ठेवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील चेंगराचेंगरीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक निवेद जारी केले आहे.  पंतप्रधानांनी या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांप्रति शोक व्यक्त केला आहे. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. पंतप्रधानांनी अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदतही मिळणार आहे.

राज्यपालांनी व्यक्त केले दुःख 

पश्चिम बंगालचे राज्यपाल रवी यांनी कोलकाता येथील दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला.

अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील सर्व कार्यक्रम स्थगित केले

दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. अमित शाह यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहिली. जखमींना प्रशासन सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील उद्याचे आपले सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत. ते जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने जारी केला  हेल्पलाइन क्रमांक 

दरम्यान, दुर्गापूजेदरम्यान घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने एक टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. लोक १८००३४५५६७८ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.  पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केले. या घटनेची बातमी ऐकून आपल्याला तीव्र धक्का बसला असून दुःख झाल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. टीएमसी आमदार कुणाल घोष यांनी चोरबागान पूजा मंडपात झालेल्या अपघाताला “अत्यंत दुर्दैवी घटना” म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे.

admin
Author: admin

और पढ़ें