Search
Close this search box.

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणला BMC चा दणका; जुहूतल्या अलिशान बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या मुंबईतील जुहू परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं धडक कारवाई केल्याचं समोर आलं आहे. महापालिकेची परवानगी न घेता बंगल्याच्या अंतर्गत भागात फेरफार आणि बांधकाम सुरू ठेवल्यानं बीएमसीने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय.

तर अभिनेताअजय देवगणचा मुंबईतील जुहू इथल्या कपोल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याच्या नूतनीकरणाचं आणि अंतर्गत बांधकामाचं काम काही दिवसांपासून सुरू होतं.

या बांधकामादरम्यान महापालिकेच्या नियमांचं उल्लंघन करून आवश्यक परवानग्या न घेता अंतर्गत बदल केले जात असल्याच्या तक्रारी बीएमसीकडं आल्या होत्या. बंगल्यातील अंतर्गत रचनेत अनधिकृत फेरफार करणं, बीएमसीच्या मंजुरीशिवाय विभाजक भिंती उभारणं,नवीन खिडक्या आणि इतर अंतर्गत संरचनात्मक बदल करणं यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, सं बीएमसीनं म्हटलंय.

नोटीस देऊनही काम सुरूच राहिल्यानं कारवाई

बीएमसीच्या पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेतली. महापालिकेनं १० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका कायद्याच्या (BMC Act) कलम ३५४-अ (Section 354A) अंतर्गत अजय देवगणला कायदेशीर नोटीस बजावली होती.

बंगल्यात सुरू असलेले सर्व अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबवण्यात यावं. तसंच सदर बांधकामाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे, परवानग्या आणि मंजुरी पत्रे महापालिकेकडं सादर करावीत, असे निर्देश या नोटीसद्वारे बीएमसीनं दिले होते.

मात्र, नोटीस बजावल्यानंतरही दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर केली गेली नाहीत आणि अनधिकृत बांधकाम तसंच सुरू ठेवण्यात आले. महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येताच बीएमसीच्या पथकाने बंगल्यावर धाड टाकून अनधिकृतपणे उभारलेले काही भाग तोडून पाडल्याचं समोर आलंय.

या कारवाईवर अद्याप अजय देवगण किंवा त्याच्या टीमकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य किंवा प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दरम्यान, अजयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या दृश्यम ३ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तब्बल ५०० कोटींच्या वर कमाई केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें