Search
Close this search box.

महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उन्हाचा चटका? आज कसं असेल हवामान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी परतीच्या प्रवासाने झोडपले आहे. मुंबईतही मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळं कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

म्यानमारच्या किनाऱ्यालगत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकत आहे. बांगलादेशच्या किनाऱ्याकडे सरकताना ही प्रणाली विरून जाणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणासह गुजरात, उत्तर प्रदेशच्या काही भागातून माघार घेतली आहे. तर, महाराष्ट्रातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे.

आज कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामान असणार आहे. तसंच, वातावरणात उन्हाचा चटकादेखील कायम राहणार आहे.

ऑक्टोबर हिटला सुरुवात

मुंबईत काही दिवस ढगाच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. तर ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून उकाडा जाणवू लागणार आहे. असे असले तरी काही भागांत पहाटे काही ठिकाणी धुके आणि दव पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळं ही थंडीचा चाहूल आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट

यंदा देशासह महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. देशात एकूण 12 टक्के तर महाराष्ट्रात 19 टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक 39 टक्के आणि विदर्भात 26टक्के पावसाची घट झाली आहे, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले

admin
Author: admin

और पढ़ें