Search
Close this search box.

14 वर्षीय भाचीचा व्हिडीओ पाहून मामा हादरला! जाब विचारल्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य, ‘भावाला मारुन…’, अल्पवयीन मुलं ताब्यात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहित बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी मुलंही अल्पवयीन आहेत. आरोपींनी लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडीओ शूट केला आणि त्याआधारे मुलीला धमकावत होते. आरोपींनी व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर घटना उघडकीस आली. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं आहे.

14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या दोन मुलांनी सामूहिक बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडियो तयार केले. व्हिडियो वायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पीडित मुलगी नालासोपारा पूर्वेला राहते. इन्स्टाग्रामवर 17 वर्षाच्या आरोपी मुलाशी तिची ओळख झाली होती. 11 जुलै रोजी दुपारी त्याने मुलीला इन्स्टाग्रामवर मेसेज करून एक महत्वाचे काम आहे असे सांगून भेटायला बोलावले. मुलगी गेल्यावर तिच्या त्याच परिसरातील एका चाळीतील खोलीत नेले. तिथे आणखी एक17 वर्षांचा मुलगा उपस्थित होता. त्या दोघांनी मुलीवर बलात्कार केला आणि मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर व्हिडियो वायरल करेन तसंच तुझ्या भावाला मारून टाकेन अशी धमकी त्यांनी दिली होती. यामुळे मुलीने कोणाकडे या घटनेची वाच्यता केली नाही.

दरम्यान, आरोपी मुलांनी पीडित मुलीचा व्हिडिओ वायरल केला. 15 ऑगस्ट रोजी व्हिडिओ मुलीच्या मामाला मोबाईलवर दिसला. त्याने तडक मुलीच्या घरी जाऊन विचारणा केली तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यांनर मुलीने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी दोन्ही मुलांविरोधात सामुहिक बलात्कार, धमकी आणि अश्लील व्हिडियो वायरल केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 70 (2), 65 (1) 351 (2), 351 (3), माहिती तंत्रत्रान अधिनियमाच्या कलम 66 (ई) (बी) अन्वये तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4,6, 8, 10 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकऱणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमर मराठे हे करत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें