महालक्ष्मी रेसकोर्समधील मे. बीजेआरएस (गॅलॉप्स) रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. स्वच्छता तसेच अन्नसुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचे आढळल्यानंतर एफडीएने कारवाई केली आहे. एफडीएच्या तपासणीत फ्रीजमधील (Mumbai News) बर्फावर मांसाहारी पदार्थांचे रक्त तसेच केचअपचे डाग आढळल्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तपासणीत जिवंत झुरळ व मुंग्यांचा वावर, फाटलेल्या पॅकिंगमधील कच्चा माल, स्वयंपाकघरातील ग्रीस साचणे, भिंतींची झीज, ड्रेनेज अस्वच्छता, झुरळ, अपुरी झाकणव्यवस्था, पाणी साचलेलं आढळल्यानंतर एफडीएने ही कारवाई केली आहे.(Mumbai News)
तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणी/लसीकरणाच्या नोंदींचा अभाव असल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी रेस्टॉरंटला सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र फेर तपासणीतही त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यासह मालाड पूर्वेकडील गुरुकृपा डेरी प्रॉडक्ट, वर्सोव्यातील गुरफान सीख कॉर्नर तसेच वांद्र्यातील ड्रीमर हॉस्पिटॅलिटी आणि मिरारी याचाही परवाना निलंबित करण्यात आला आहे. (Mumbai News)
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) काल (मंगळवारी, ता22) ही कारवाई केली आहे. मुंबईच्या खाद्यान्न विश्वातील परिचित नाव असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्स येथील ‘गॅलॉप्स’ (Gallops) चा परवाना निलंबित केलं. अन्न निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, किचनमधील फ्रीजमधील बर्फावर मांसाहारी अन्नाचे रक्त आणि केचपचे डाग, तसेच स्वयंपाकघरात ग्रीस (तेलकटपणा), जिवंत झुरळे आणि मुंग्या आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. महालक्ष्मी रेसकोर्स येथील ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’च्या आत असलेल्या मेसर्स बीजेआरएस (गॅलॉप्स) रेस्टॉरंटवर सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, “तपासणीदरम्यान फाटलेल्या किंवा खराब झालेल्या पॅकेजिंगमधील कच्चा माल, खराब झालेल्या भिंती, ड्रेनेज आणि कॉकरोच ट्रॅप्स योग्य प्रकारे न झाकणे, साचलेले पाणी आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी व लसीकरणाच्या नोंदींचा अभाव दिसून आला; याशिवाय बर्फावर रक्त आणि केचपचे डाग, जिवंत झुरळे आणि मुंग्याही आढळल्या.” हे शेड्युल ४ (Schedule 4) अंतर्गतातील नियमांचे सतत उल्लंघन असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गॅलॉप्सने महालक्ष्मी रेसकोर्सवर ४० वर्षे पूर्ण केल्यानंतर काही महिन्यांतच एफडीएची ही कारवाई झाली आहे. जॅस्मिन आणि बॉबी सिंग तसेच राहुल मलिक या तीन मित्रांनी रेसकोर्सवर रेस्टॉरंट चालवण्याची बोली जिंकल्यानंतर १९८६ मध्ये हे रेस्टॉरंट सुरू झाले होते. गेल्या काही दशकांमध्ये, गॅलॉप्स हे त्याच्या वर्षानुवर्षांच्या प्रसिद्ध मेनूसाठी आणि रेसकोर्सच्या विहंगम दृश्यासाठी ओळखले जाऊ लागले. सणासुदीच्या काळातील तपासणीदरम्यान मुंबईत सर्वात मोठ्या मूल्याची जप्ती मालाड पूर्व येथील मेसर्स गुरुकृपा डेअरी प्रॉडक्ट्समधून झाली. अधिकाऱ्यांनी येथे सुमारे १३.५५ लाख रुपये मूल्याचे सुमारे २,४६४.०५ किलो भेसळयुक्त आणि दिशाभूल करणारे लेबल असलेले तूप, रिफाइंड सनफ्लावर तेल आणि वनस्पती तूप जप्त केले.
अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा-यारी रोडवरील मेसर्स गुफरान सीख कॉर्नर येथे एफडीएला असे आढळून आले की, हे रेस्टॉरंट वैध अन्न परवाना किंवा नोंदणीशिवाय चालवले जात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “तपासणीत शेड्युल ४ अंतर्गत उल्लंघनही आढळून आले… एफडीएने २२ सप्टेंबर रोजी एक बंधनकारक आदेश जारी करून त्यांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आणि वैध परवाना किंवा नोंदणी मिळेपर्यंत व त्रुटींची दुरुस्ती करेपर्यंत कामकाज पूर्ववत न करण्याचे निर्देश दिले.” एफडीएने वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड येथील मेसर्स ड्रिमर हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना देखील निलंबित केला, कारण तेथील तपासणीत शेड्युल ४ अंतर्गत स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित तरतुदींचे उल्लंघन आढळून आले. असेच उल्लंघन वांद्रे पश्चिम येथील सेंट डोमिनिक रोडवरील मेसर्स मिरारी येथेही आढळून आले. “आम्ही एफएसएसएआय (FSSAI) च्या काही गरजा व अटी पूर्ण करण्यासाठी विक्री तात्पुरती थांबवत आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांच्या संयमाची प्रशंसा करतो आणि लवकरच पुढील अपडेट्स शेअर करू,” असे गॅलॉप्सच्या प्रवक्त्याने सांगितले.








