Search
Close this search box.

Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारतीय शेअर बाजारात 2 ते 6 नोव्हेंबर हा दमदार तेजीचा आठवडा ठरला. या आठवड्यात सेन्सेक्स 8.8 टक्क्यांनी वधारला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी केल्यानं हे चित्र पाहायला मिळालं आहे. तर, सात सत्रात 10.6 टक्क्यांनी वधारला. दिवाळी पूर्वी शेअर बाजाराची गेल्या 35 वर्षातील ही दमदार कामगिरी ठरली आहे.

अमेरिकेमधील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचा झालेला पराभव आणि त्यानंतर इराण विरोधातील युद्धाबाबत अमेरिकेची भूमिका बदलण्याची शक्यता आणि क्रूड ऑईलच्या दरात 20 टक्के घसरण झाल्यानं त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सलग सात दिवस  भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आल्यानं सेन्सेक्समध्ये 10.6 टक्क्यांनी वधारला.

शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 1781 अंकांची तेजी दिसून आली. सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स एक हजारांपेक्षा जास्त अंकांनी वाधरला. भारतीय शेअर बाजारात तेजीचं सत्र पाहायला मिळत असताना अमेरिकन मार्केट मात्र क्रॅश झालं.

शेअर बाजारात सलग 7 सत्रात सेन्सेक्समध्ये 7782 अंकांची वाढ झाली. भारतीय शेअर बाजारातील तेजीमागं प्रमुखं कारण म्हणजे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी खरेदी करणे हे आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी 49500 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी भारतीय बाजारातून केली आहे.

एनएसईवर निफ्टीमध्ये 8.6 टक्क्यांची म्हणजेच 1977 अंकांची वाढ झाली. निफ्टी 25030अंकांवर पोहोचला आहे. सेन्सेक्स 80 हजारांच्या वर तर निफ्टी 25 हजारांपेक्षा जास्त अंकांवर बंद झाला.

भारतीय शेअर बाजारातील तेजी गेल्या तीन दिवसांमध्ये वाढली आहे. डेमोक्रेटिक पक्षानं अमेरिकेमधील मध्यावधी निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानं क्रूड ऑईलचे दर घटले, रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला.

शेअर बाजारात या आठवड्यात महिंद्रा अँड महिंद्राचा  शेअर 16 टक्क्यांनी वधारला. बजाज फायनान्सचा शेअर  16 टक्के, एचडीएफसी बँकेचा शेअर 14 टक्क्यांनी वधारला. भारती एअरटेल मार्केट कॅपच्या दृष्टीनं दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली. भारती एअरटेलचं मार्केट कॅप 13.1 लाख कोटी आहे. तर जिओ एअरटेलचं मार्केट कॅप 12.9 लाख कोटी आहे.

संमत वर्ष 2082 मधील शेवटचं ट्रेडिंग सत्र काल पार पडलं. या वर्षात सेन्सेक्समध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली, तर निफ्टी 3.1 टक्क्यांनी घसरला. चांदीच्या दरात 24 टक्क्यांची तर सोन्याच्या 17 टक्क्यांची वाढ झाली.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

admin
Author: admin

और पढ़ें